Jio Recharge Plan : देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच एकापेक्षा एक मस्त मस्त ऑफर सादर करत असते.
यातच जर तुम्ही देखील तुम्ही Jio वापरकर्ता असाल आणि तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यासाठी स्वस्तात मस्त रिचार्ज हवे असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला एका जबरदस्त रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या या रिचार्जमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
जिओचा 388 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. हे दररोज 2GB डेटा प्रदान करते. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. त्यानुसार पाहिले तर एकूण 56GB डेटा उपलब्ध आहे. तुम्ही 5G नेटवर्क वापरत असल्यास, तुम्ही अमर्यादित 5G डेटा वापरण्यास सक्षम असाल.
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स उपलब्ध आहेत. एक प्रकारे, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉल्सचा लाभ घेता येतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत.
Jio वापरकर्त्यांना या पॅकमध्ये Disney + Hotstar चे फायदे मिळतात. म्हणजेच एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला डेटासह मनोरंजनाचा आनंद मिळेल. यासह, JioSaavn Pro JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात. लक्षात ठेवा की Jio ग्राहकांना या प्लॅनमध्ये Jio Cinema सबस्क्रिप्शनसह JioCinema प्रीमियमचे फायदे मिळू शकणार नाहीत.
हा प्लॅन घेतल्यानंतर यूजर्सला डेटाची चिंता करावी लागणार नाही. या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन प्रदान करते.