Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनीची आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी शानदार रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या देखील जास्त आहे. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही Disney+ Hotstar चा आनंद घेऊ शकता. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटा कॉलचा आनंद घेता येईल.
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
किमतीचा विचार केला तर कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 328 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात येत आहे.
इतर फायद्यांबद्दल बोलताना, Jio तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश मिळेल. तसेच, कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी दिले जात आहे, जो प्लॅनचा सर्वात मोठा फायदा आहे.
मोफत मिळेल Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन
कंपनीच्या 758 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील ऑफर केले जात असून त्याची वैधता 84 दिवसांची असणार आहे आणि दररोज 1.5 GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टारचे 3 महिन्यांसाठी सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
इतकेच नाही तर कंपनीच्या या 388 रुपयांच्या प्लॅनमध्ये, तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटासह 3 महिन्यांचे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल. तर त्याच वेळी, 808 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन ऑफर करण्यात येत आहे.