Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ (Reliance Jio) अनेक उत्तम प्लान देत आहे. जिओचे हे प्लान प्रत्येक रेंजमध्ये येतात. यामध्ये तुम्हाला दैनंदिन डेटा आणि फ्री कॉलसोबत अतिरिक्त फायदेही मिळतात. रिचार्ज प्लानच्या (Jio Recharge Plan) यादीमध्ये असे काही प्लान देखील आहेत, जे फायद्यांच्या बाबतीत भिन्न आहेत. या प्लानमुळे पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचे टेन्शनही दूर होते. यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा आणि फ्री कॉल देखील मिळेल. याशिवाय, यापैकी काही प्लानमध्ये कंपनी डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन (Free Subscription) देखील देत आहे. चला तपशील जाणून घेऊ या.
4199 रुपयांचा प्लान
जिओचा हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी दररोज 3 GB नुसार एकूण 1095 GB डेटा देत आहे. जिओच्या या वार्षिक योजनेचे सदस्य संपूर्ण वर्षभर देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करू शकतात. या प्लानमध्ये दररोज 100 मोफत SMS सह, तुम्हाला Disney + Hotstar Premium चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल, जे एका वर्षासाठी वैध असेल.
2999 रुपयांचा प्लान
एक वर्षाच्या वैधतेच्या या प्लानमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये Jio 6 व्या वर्धापन दिनानिमित्त लाभ म्हणून इंटरनेट वापरण्यासाठी 75 GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल () आणि 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Disney+ Hotstar सह Jio अॅप मोफत सदस्यता समाविष्ट आहे.
2879 रुपयांचा प्लान
जिओचा हा प्लान 365 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल मिळतात. कंपनी प्लानमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभही देत आहे. कंपनीचा हा वार्षिक प्लान Jio अॅप मोफत प्रवेशासह येतो.