Jio Recharge Plan : जिओचा भन्नाट प्लॅन! 1000GB डेटासह 2 वर्षांसाठी मोफत मिळेल Amazon Prime

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी असे काही प्लॅन आणले आहेत ज्यात 1000GB डेटासह 2 वर्षांसाठी Amazon Prime मोफत मिळेल.

Jio चा 1499 रुपयांचा प्लॅन

कंपनी या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 1000 GB डेटा देत असून प्लॅन 300Mbps चा इंटरनेट स्पीड देतो. या शानदार प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे. नवीन वापरकर्त्यांना 6 आणि 12 महिन्यांसाठी या योजनेचे सदस्यत्व घेता येईल. हा प्लॅन दोन वर्षांसाठी Amazon Prime Lite चे मोफत सबस्क्रिप्शन देतो. यात तुम्हाला Sony Liv, Disney + Hotstar, Jio Cinema Premium आणि Netflix Basic वर मोफत प्रवेश मिळेल.

Jio चा 2499 रुपयांचा प्लॅन

कंपनी या प्लॅनमध्ये 500Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड देत असून या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1000 GB डेटा मिळेल. या शानदार प्लॅनमध्ये 800 हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत प्रवेश मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची असेल. नवीन वापरकर्त्यांना 6 आणि 12 महिन्यांसाठी सदस्यत्व घेता येईल. या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite ला 2 वर्षांसाठी मोफत प्रवेश मिळेल. तुम्हाला Netflix Standard, Jio Cinema Premium, Sony Liv, Disney + Hotstop आणि G5 सह अनेक ॲप्सचा मोफत प्रवेश मिळेल.

जिओचा 3999 रुपयांचा प्लॅन

हे लक्षात घ्या की प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. नवीन वापरकर्त्यांना 6 आणि 12 महिन्यांसाठी सदस्यत्व घेता येईल. या प्लॅनमध्ये 1Gbps चा इंटरनेट स्पीड देत आहे. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला 1000 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये 800 हून अधिक टीव्ही चॅनेलला प्रवेश मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 वर्षांसाठी Amazon Lite वर मोफत प्रवेश दिला जाईल. हा प्लॅनमध्ये Disney+ Hotstar, Sony Liv, ZEE5 आणि Eros Now वर मोफत प्रवेश मिळेल.

Leave a Comment