Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्यामुळे याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 84 दिवस मोफत Netflix, अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येईल.
जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
हा Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे जो मोफत Netflix सह येतो. हे 84 दिवसांच्या वैधतेसह येत असून 13 रुपयांच्या दैनंदिन खर्चासाठी तुम्ही मोफत Netflix, अमर्यादित डेटा आणि कॉल्सचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस लाभ घेता येईल.
इतकेच नाही तर या शानदार प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाही मिळतो. म्हणजेच, संपूर्ण 84 दिवसांच्या वैधतेदरम्यान, ग्राहकांना एकूण 168GB 4G डेटाचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये Netflix (मोबाइल) सबस्क्रिप्शन उपलब्ध असून हे लक्षात ठेवा. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश मिळेल.
जिओचा 1499 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
किमतीचा विचार केला तर Jio चा दुसरा सर्वात स्वस्त मोफत Netflix सबस्क्रिप्शन प्लॅन Rs 1499 मध्ये येतो. या शानदार प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दैनंदिन खर्च 17 रुपये असून कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.
प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा देखील उपलब्ध आहे, म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेदरम्यान, तुम्हाला एकूण 252GB 4G डेटाचा लाभ घेता येईल. प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स (बेसिक) सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश देखील उपलब्ध आहे.