Jio Recharge: जिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात काही ना काही जबरदस्त ऑफर सादर करत असतो. या ऑफर अंतर्गत जिओ ग्राहकांना कमी किमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री डेटा आणि एसएमएस सारखी सुविधा उपलब्ध करून देतो.
यातच तुम्ही देखील तुमच्या मोबाईलसाठी सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला जिओच्या काही रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत.
ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी सर्वात भारी रिचार्ज प्लॅन निवडू शकतात. चला मग जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.
जर तुम्ही Jio चे ग्राहक असाल आणि तुम्ही तुमच्यासाठी 2 महिन्यांसाठी स्वस्त आणि फायदेशीर प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्लान घेऊन आलो आहोत.
या प्लॅनची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याची किंमत. रोजच्या हाय स्पीड डेटासोबत तुम्हाला प्लानमध्ये अनेक फायदेही मिळत आहेत.
Jio 479 Recharge Plan
Jio च्या 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज बोलण्यासाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5GB डेटाही उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्हाला 56 दिवसांसाठी एकूण 84 जीबी डेटा मिळेल.
Jio कंपनीचा हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे.
अतिरिक्त फायदे बघितले तर त्यात Jio Cloud, Jio Cinema, JioTv ची सुविधा दिली जात आहे. प्लॅनमधील दैनिक डेटा स्पीड @ 64 Kbps पर्यंत कमी होतो.
Jio 529 Recharge Plan
जिओचा हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB/दिवस मिळेल. अशा प्रकारे तुम्ही एकूण 84 जीबी डेटा वापरू शकता. प्लॅनमध्ये बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.
याशिवाय प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Jio Cloud, Jio Cinema, JioTv च्या सुविधा दिल्या जात आहेत.