Jio Prepaid Plan : Jio समोर Airtel-Vi ला फुटला घाम, ‘इतक्या’ स्वस्तात मिळवा अनलिमिटेड कॉलिंगसह घ्या 5G इंटरनेटचा आनंद

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. अशातच आता या कंपनीने Airtel-Vi ला कडवी टक्कर दिली आहे, तुम्ही आता या प्लॅनमध्ये स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगसह 5G इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.

जिओचा 395 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळत असून या शानदार प्लॅनमध्ये एकूण 6 GB हायस्पीड डेटा देण्यात आला आहे. जर तुमचा इंटरनेट वापर कमी असल्यास आणि तुम्ही कॉलवर जास्त बोलत असाल तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वात उत्तम असणार आहे.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध असून या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी एकूण 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. किमतीचा विचार केला तर जिओच्या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना जिओच्या ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. प्लॅनमध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यांचा समावेश असून हा प्लॅन फक्त MyJio ॲपवर उपलब्ध आहे.

Vi चा 459 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

Vi च्या या प्लॅनमध्ये 6GB डेटा उपलब्ध असून या प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे. तसेच प्लॅन अमर्यादित कॉलिंगला सपोर्ट करतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 1000 एसएमएस देण्यात आले आहेत. इतर फायद्यांमध्ये Vi Movies & TV बेसिक ऍक्सेसचा समावेश होत असून यात लाइव्ह टीव्ही, बातम्या, चित्रपट आणि ओरिजिनल्सचा प्रवेश समाविष्ट असतो.

एअरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येत असून यात अमर्यादित कॉलिंगसह, 3 महिन्यांचे डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह 100 SMS आणि 2.5GB प्रतिदिन सुविधा दिली आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये Apollo 24×7 सर्कल सबस्क्रिप्शन आणि फ्री Hellotune उपलब्ध आहेत.

Leave a Comment