Jio Plan: देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ त्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर करत असते. असाच एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन जिओने पुन्हा एकदा सादर केला आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या रिचार्ज प्लानबद्दल सविस्तर माहिती.
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटाचा लाभ मिळणार आहे. आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत. तो रिचार्ज प्लॅन तुम्हाला फक्त 349 रुपयांमध्ये मिळणार आहे. हा प्लॅन सक्रिय करण्यासाठी तुम्ही ते कोणत्याही ऑनलाइन पेमेंट अॅप किंवा माय जिओ अॅपद्वारे करू शकता.
वैधता आणि फायदे
या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही 30 दिवसांसाठी वापरू शकता. ज्यामध्ये तुम्हाला दररोज हाय स्पीड 2.5GB इंटरनेट सुविधा मिळते. जर तुमचे हाय स्पीड इंटरनेट संपले तर तुम्ही 64 Kbps वेगाने इंटरनेट सेवा सहज वापरू शकता.
याशिवाय, या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS प्रतिदिन पर्याय म्हणून मिळतात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.