मुंबई : रिलायन्स जिओचा एकदम खास प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज खर्च होणाऱ्या डेटावर कोणतीही मर्यादा नाही. ही जिओची खास योजना आहे. जिओचा हा प्लॅन 296 रुपयांचा आहे. जिओचा असा हा एकच रिचार्ज प्लॅन आहे, चला तर मग जाणून घेऊ या की या प्लॅनमध्ये युजर्सना कोणते फायदे मिळतात.
रिलायन्स जिओच्या या नो डेली डेटा लिमिट प्लानमध्ये यूजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. रिचार्ज प्लॅनमध्ये 25GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज वापरल्या जाणार्या डेटावर कोणतीही मर्यादा नाही. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल लाभ मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच प्लॅनमध्ये जिओ अॅप मोफत सब्सक्रिप्शन दिले जाते.
जर आपण Jio च्या सर्वाधिक डेटा प्लॅनबद्दल विचार केला तर एका रिचार्जमध्ये 1095GB डेटा मिळतो. हा Jio चा 4199 रुपयांचा प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल लाभ मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
दरम्यान, जिओ लवकरच भारतात 5G नेटवर्क आणणार आहे. Jio पहिल्या टप्प्यात भारतातील 1000 शहरांमध्ये 5G नेटवर्क प्रदान करेल. कंपनी बऱ्याच काळापासून 5G चाचणी करत आहे. जिओचा दावा आहे, की त्यांचा 5G पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. Jio कडून त्याच्या 5G नेटवर्कवर हेल्थकेअर आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी घेतली जात आहे. कंपनी 5G च्या जलद उपयोजनासाठी पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करत आहे.
जिओ 5G नेटवर्क प्रथम त्या भागात आणले जाईल जेथे डेटाचा जास्त वापर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2021 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरून हे उघड झाले आहे. जिओने ग्राहक आधारित 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी अनेक संघ तयार केले आहेत. जे देशात तसेच अमेरिकेत तैनात आहेत, ते विविध प्रकारचे 5G सोल्यूशन्स विकसित करू शकतात. कंपनीचा विश्वास आहे, की हे संघ 5G सोल्यूशन्स तयार करतील जे तंत्रज्ञानात जगाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा चांगले असतील. याशिवाय, कंपनीने युरोपमध्ये एक टेक्नॉलॉजी टीम देखील तयार केली आहे जी पुढे 5G साठी तयारी करेल.