मुंबई – कमी दरातील प्लान बाबत टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom Company) सतत स्पर्धा सुरू असते. लोक कमीत कमी किमतीचा प्लान शोधत असतात. अशात आता दिग्गज टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) खास प्लान ऑफर करत आहे ज्यामुळे 28 दिवसांच्या वैधतेचे (Validity) टेन्शन राहणार नाही. होय, Jio कंपनीने पूर्ण महिनाभरासाठी प्लान सादर केला आहे. यामध्ये अनेक फायदेही दिले जातात.
जिओने नुकताच 259 रुपयांचा महिनाभरासाठी प्लान सादर केला आहे. महिन्याला फक्त एक रिचार्ज (Recharge) तारीख लक्षात ठेवण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जर जून महिना 30 दिवसांचा असेल तर हा प्लान 30 दिवसांचा असेल आणि कोणताही महिना 31 दिवसांचा असेल तर हा प्लान 31 दिवसांचा असेल. 259 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो आणि डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps होईल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल (Unlimited Voice Call) आणि 100SMS दररोज उपलब्ध असतील. याशिवाय जिओ अॅप मोफत सबस्क्रिप्शनही (Free Subscription) दिले जात आहे. त्याची वैधता एक महिन्याची आहे आणि दर महिन्याला त्याच तारखेला प्लानचे नूतनीकरण केले जाईल. Jio च्या बाकीच्या प्रीपेड प्लान (Prepaid Plan) प्रमाणे 259 रुपयांचा प्लान देखील एकावेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतो. यामुळे अनेक प्रकारचा त्रास टाळता येतो, तसेच रिचार्ज करण्याचा त्रासही राहत नाही.
जिओप्रमाणेच अन्य कंपन्यांनीही असे काही प्लान सादर केले आहेत. त्यामुळे या प्लानची तुलना करून तुम्ही चांगला आणि कमी किंमतीतील प्लान खरेदी करू शकता.
एअरटेलचे ‘हे’ दोन प्लान आहेत बेस्ट; जिओ-व्होडाफोनलाही दिलीय मात; पहा, काय मिळतात फायदे..