5G : नुकताच 5G स्पेक्ट्रमचा (5G Spectrum) लिलाव संपला आहे. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या गेल्या दोन वर्षांपासून 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत आणि आता Airtel, Jio, Vodafone Idea 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. स्पेक्ट्रम लिलावानंतर, जिओने सांगितले होते की ते 5G नेटवर्क (5G Network) लाँच करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल. जिओनंतर एअरटेलनेही असेच विधान केले आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जिओ आणि एअरटेलचे 5 जी लाँच होण्याची शक्यता आहे. Vodafone Idea ने अद्याप 5G लाँच करण्याबाबत असे कोणतेही विधान केलेले नाही.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) 5G बाबत मोठा दावा केला आहे. जिओचे म्हणणे आहे, की ते लवकरच देशातील 1,000 शहरांमध्ये 5G कव्हरेज पूर्ण करेल. jio कडे अनेक बँडसह 5G चे सर्वाधिक बँड आहेत. जिओने सर्वाधिक स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आणि व्होडाफोन आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. Jio च्या नेटवर्कला चांगला स्पीड मिळण्याची अपेक्षा आहे कारण Jio ने मिड-बँडविड्थ स्पेक्ट्रम विकत घेतला आहे तर Airtel ने sub-GHz (700 MHz) स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.
टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या तीव्र स्पर्धा आहे. सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) या स्पर्धेत मागे पडली आहे. खासगी कंपन्या 5G नेटवर्क लाँच करण्याची तयारी करत असताना बीएसएनएलने तर अजून 4G नेटवर्क (4G Network) सुद्धा लाँच केलेले नाही. काही ठिकाणी मात्र 4G नेटवर्क सुरू केले असले तरी देशातील बहुतांश ठिकाणी कंपनीचे 4G नेटवर्क नाही. अशा परिस्थितीत अन्य कंपन्या मात्र बऱ्याच पुढे निघून गेल्या आहेत. या गोष्टी लक्षात आल्याने आता सरकारने बीएसएनएलकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लवकरच देशभरात 4G नेटवर्क लाँच करण्याची तयारी आहे. तसेच भविष्यात 5G लवकर आणण्याच्या दृष्टीनेही विचार होऊ शकतो. सरकारने बीएसएनएलसाठी निधी देण्याचीही घोषणा केली आहे.