Sim Card Rules: Jio, Airtel, VI ग्राहकांनो लक्ष द्या, सरकारने सिम कार्डचे नियम बदलले, जाणून घ्या सर्व काही

Sim Card Rules : फसवणूक टाकण्यासाठी सरकारकडून अनेकदा  सिम कार्डचे नियम बदलले जात असतात. त्यामुळे याबाबत माहिती असणे खूप आवश्यक आहे.

यावेळी देखील सरकारने मोठा निर्णय घेत सिम कार्डचे नियम बदलले आहे. ज्याचा थेट परिणाम परदेशी नागरिकांवर होणार आहे.

पूर्वी परदेशी नागरिकांना भारतीय नंबर मिळविण्यासाठी खूप अडचणी येत होत्या मात्र आता  कारण OTP मिळवण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आल्याने त्यांना सहज भारतीय नंबर मिळू शकते.

 माहितीनुसार, भारतीय वापरकर्त्यांसाठी नियमांमध्ये सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा थेट परिणाम परदेशी नागरिकांवर होणार आहे. कारण याआधी त्यांना भारतात आल्यानंतर नवीन नंबर मिळविण्यासाठी खूप अडचणी येत होत्या.  मात्र नवीन नियमांनुसार त्यांना नवीन नंबर मिळवणे सोपे होणार आहे. कारण आता त्यांना OTP देण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. त्याऐवजी तो यासाठी ईमेल वापरू शकतो.

पूर्वी काय व्हायचे?

यापूर्वी परदेशी नागरिकांना सिम घेण्यासाठी स्थानिक नंबर वापरावा लागत होता आणि त्यांच्या नंबरवर ओटीपी पाठवला जात होता, मात्र आता तो ऐच्छिक करण्यात आला आहे. म्हणजेच, त्याला हवे असल्यास, ते OTP मिळविण्यासाठी ईमेल वापरू शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी स्थानिक नंबर असणे बंधनकारक नाही. अलीकडेच या संदर्भात सरकारने एक निर्णय घेतला असून त्यामुळे अनेक परदेशी नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

EKYC अनिवार्य

नवीन सिम घेण्यासाठी सरकारने नियमात असा बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही सरकारने स्थानिक नागरिकांसाठी नवीन कनेक्शनच्या नियमात बदल केले होते. यामध्ये EKYC अनिवार्य करण्यात आले होते. फसवणूक टाळण्यासाठी आता कोणत्याही यूजरला सिम घ्यायचे असेल तर EKYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Leave a Comment