Jio Air Fiber : जिओ एअर फायबर (Jio Air Fiber) लाँच करण्यात आले आहे. मात्र लाँच झाल्यामुळे जिओने एअरटेलची चिंता वाढवली आहे. कारण जिओ एअरटेलपेक्षा स्वस्त दरात अधिक सुविधा देत आहे. तसेच अनेक मोफत सुविधाही देत आहे. यामध्ये Netflix, Amazon Prime आणि Jio Cinema सारख्या OTT अॅप्सचे मोफत सदस्यत्व समाविष्ट आहे. Jio आणि Airtel च्या प्लॅनमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊ या.
किती शहरांमध्ये उपलब्ध आहे?
जिओ एअर फायबर 8 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे या शहरांत उपलब्ध आहे. तर एअरटेल एअर फायबर फक्त दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
टीव्ही चॅनल
Jio Air Fiber च्या सात 550 हून अधिक टीव्ही चॅनेलचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. तर एअरटेलमध्ये अशी सुविधा उपलब्ध होणार नाही. एअरटेल नेटफ्लिक्स, प्राइमसह 16 ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन देत आहे. एअरटेल एअर फायबरमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार नाही. जिओकडून स्मार्ट होम सेवा देण्यात येत आहे. जिओमध्ये ही सुविधा मिळणार नाही.
4K सेटअप बॉक्स
4k सेटअप बॉक्सची सुविधा Jio Air Fiber सोबत दिली जाईल. जी Airtel Air Fiber मध्ये उपलब्ध नाही.
किंमत आणि स्पीड
Jio Air Fiber ची सुरुवातीची किंमत 599 रुपये आहे. याचा टॉप स्पीड 1Gbps आहे. तर Airtel Air Fiber ची सुरुवातीची किंमत 799 रुपये आहे. त्याचा वेग 100mbps आहे. जिओ एअर फायबरसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही, तर एअरटेल 2500 रुपये सुरक्षा ठेव घेत आहे.