Jayant Patil । कोरोना काळात मेलेल्या व्यक्तीच्या नावावर पैसे काढणारा BJP आमदार कोण? जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

Jayant Patil । महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असते. सध्या अशाच एका कारणावरून महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याने भाजपवर निशाणा साधला आहे.

आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धक्कादायक आरोप केला आहे. भाजपच्या एका आमदाराने कोरोना काळात मेलेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींच्या माध्यमातून पैसे काढल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

विधानसभेत जयंत पाटील बोलताना म्हणाले की, “कोरोना महामारीच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जीवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. हे प्रकरण खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये घडले आहे. 2020 मध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून स्वतःचा फायदा केला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी बोगस डॉक्टर दाखवले गेले आहे. या रुग्णालयाकडून बोगस डॉक्टर दाखवून करारनामा करण्यात आला आहे. डॉ. शशिकांत कुंभार यांनी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नसूनही त्यांच्या नावाने उपचार दाखवले आहेत. सातारा जिल्हा परिषदेकडे खोटी कागदपत्रे दाखवून 300 बेडचे रुग्णालय नुतनीकरण करून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी घोषणा केली होती की त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी काम करेल. पण हे सरकार मृत व्यक्तींवर उपचार करण्याचे कौशल्य साध्य करत आहे.”

Leave a Comment