Japan Moon Mission : जपानने आपली पहिली चंद्र मोहीम (Japan Moon Mission) पुढे ढकलली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या पहिल्या प्रयत्नात जपान सोमवारी (28 ऑगस्ट) H2A रॉकेट प्रक्षेपित करणार होता. पण NHK नुसार खराब हवामानामुळे मिशन पुढे ढकलण्यात आले. जर जपानने आपले वाहन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले तर तो जगातील पाचवा यशस्वी देश बनेल.
जपानने आपली पहिली चंद्र मोहीम पुढे ढकलली आहे. जपान सोमवारी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरण्याच्या पहिल्या प्रयत्नात ‘H2A रॉकेट’ प्रक्षेपित करणार होता. तथापि, NHK नुसार, खराब हवामानामुळे मिशन पुढे ढकलण्यात आले.
खरेतर, जपानने सोमवारी सकाळी ९:२६ वाजता नैऋत्य कागोशिमा प्रीफेक्चरमधील तानेगाशिमा स्पेस सेंटरमधून H2A रॉकेट प्रक्षेपित करण्याचे नियोजित केले होते. NHK च्या मते H2A रॉकेट चंद्राच्या खडकांचा शोध घेईल आणि तेथे अचूक लँडिंग प्रक्रिया प्रदर्शित करेल.
यशस्वी लँडिंग करणारा जपान हा पाचवा देश होईल का?
जपानची ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान यशस्वीपणे उतरवणारा जपान हा जगातील पाचवा देश ठरेल. 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान-3 यशस्वी झाले होते. याआधी भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या चांद्रयान उतरवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश बनला. भारताच्या आधी चंद्रावर उतरलेल्या देशांमध्ये रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. जर जपानने आपले वाहन चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवले तर तो जगातील पाचवा यशस्वी देश बनेल.
भारताची मोहिम यशस्वी, खर्चही झाला कमी
भारताच्या चांद्रयान-3 चंद्र मोहिमेचा खर्च इंटरस्टेलर या हॉलिवूड चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षा खूप कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावर टेस्ला कंपनीचे प्रमुख एलोन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या उत्तरात लिहिले, हे भारतासाठी चांगले आहे.