Japan : जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्या सरकारने शुक्रवारी आर्थिक संकटाशी लढण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली. दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमती आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी सरकारने सुमारे 29 ट्रिलियन येन ($200 अब्ज) चे पॅकेज (Japanese Government Sanction Package to Control Inflation) मंजूर केले आहे. पंतप्रधान किशिदा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जागतिक किमतींसोबत जपानमधील महागाई वाढत आहे. डॉलरच्या तुलनेत येन कमजोर झाल्यामुळे खर्च वाढला आहे. सरकारच्या या प्रोत्साहन पॅकेजमुळे महागाईने त्रस्त कुटुंबांना अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे.
सरकारचे हे पाऊल म्हणजे किशिदा यांचा घसरत चाललेली लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. पॅकेजच्या प्राथमिक मंजुरीनंतर, किशिदा म्हणाले की, आम्ही सर्वांना दिलासा देण्याचे सुनिश्चित करू आणि लोकांना सर्वतोपरी मदत करू. आजकाल टोकियो शेअर बाजारातही (Tokyo Share Market) तीव्र चढउतार पाहायला मिळत आहेत. शेअरचे भाव आज घसरले.
जपान सध्याच्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वित्तीय उपाय किंवा सरकारी खर्च वापरण्यावर ठाम आहे. जास्त चलनवाढीचा सामना करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवित असताना जपानची (Japan) चलनवाढ तुलनेने मध्यम पातळीवर (3 टक्के) आहे. किमती वाढल्या तर अर्थव्यवस्था (Economy) ठप्प होईल, अशी भीती आहे.
बँक ऑफ जपानने शुक्रवारी आपल्या धोरण बैठकीत आपले मौद्रिक धोरण कायम ठेवले. परंतु असे केल्याने येन आणखी कमकुवत होण्याचा धोका आहे. फेडरल रिजर्व्ह आता दर वाढवित आहे आणि इतर चलनांवर दबाव आणत आहे. यामुळे जपानमधील किंमती वाढत आहेत, कारण जपान बाहेरील देशांकडून जास्त प्रमाणात आयात करतो. पंतप्रधान किशिदा म्हणाले, की खाजगी क्षेत्रातील निधी आणि वित्तीय उपायांसह पॅकेजचा एकूण आकार 71.6 ट्रिलियन येन ($490 ट्रिलियन) असणे अपेक्षित आहे.
- हे सुद्धा वाचा : Japan : अर्र.. चीन आणि रशियामुळे जपानी टेन्शनमध्ये; पहा, नेमका काय घडलाय प्रकार..?
- Russia Japan Tension : आता रशियावर भडकला जपान; ‘त्या’ प्रकरणात केली माफीची मागणी; जाणून घ्या..
- Russia : रशियाने मैत्री निभावली..! चीनला न घाबरता भारतासाठी केले ‘हे’ मोठे काम; पहा, काय घडले
- China Taiwan Tension : आता चीननेही केला अमेरिकेवर पलटवार; ‘या’ पद्धतीने दिले अमेरिकेला उत्तर