Jalgaon news :फॉक्सकॉन वेदांतानंतर आणखी एक टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे आकाशवाणी चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेली कागदी विमाने हवेत उडवली.यावेळी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
https://www.loksatta.com/navimumbai/marathi-articles-on-kerala-food-1503007/
देशात विमान निर्मितीला चालना देण्यासाठी टाटा एअरबस हा प्रकल्प (project)असून लष्करी विमानांची निर्मिती खासगी कंपनीव्दारे(company) होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.वेदांता फॉक्सकॉन(Vedanta foxvagon) या प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प देखील गुजरातला(gujrat) गेला आहे. राज्यातून एक एक प्रकल्प गुजररतला नेला जात असल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष कार्यकर्ते आक्रमण झाले . राज्यातून एक एक प्रकल्प गुजरातला नेला जात आहे.ही महाराष्ट्राशी गद्दार व गुजराथी वफादारी असल्याचे बोलले जात आहे .बेरोजगारांना काम नाही. सरकार गुजरात ची सेवा करण्यात मग्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे . जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे सरकारच्या निषेधार्थ आकाशवाणी चौकात निदर्शने करण्यात आली.
गद्दारांना 50 खोके तर महाराष्ट्राला धोके, उद्योगाचे विमान गुजरातलातर बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणांना, गुजरात तुपाशी तर महाराष्ट्र उपाशी, महाराष्ट्राचे गद्दार, गुजरातचे वफादार अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा(home minister amit shaha ), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(chief minister eknath shinde ), तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेली कागदी विमाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हवेत भिरकावून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.
- Travel Guide : ही आहेत एकदा तरी भेट द्यावीत अशी केरळातील सर्वात सुंदर पाच ठिकाणे
- Brain Foods: 30+ वयोगटातील लोकांनी “या” पदार्थांचे रोज सेवन करा ,वाढेल स्मरणशक्ती
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर
विमाने, बॅनरमुळे आंदाेलनाला अर्धा तास उशीर…
राष्ट्रवादीचे आंदोलन 11.30 वाजता नियोजित केले होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा कार्यालयात जमले देखील . मात्र, आंदोलनासाठीचे बॅनर व नेत्यांचे फोटो असलेली कागदी विमाने आंदोलनस्थळी उशिरा पोहोचली . त्यामुळे आंदोलन अर्धा तास उशीराने सुरु झाले. या आंदाेलनाला राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षांसह एकूण 28 कार्यकर्ते उपस्थित होते. कागदी विमाने उडवून घोषणाबाजी केल्यानंतर 20 मिनिटात आंदोलन संपले.