Diwali Faral : दिवाळीनिमित्त घरोघरी फराळ बनवण्याची लगबग सुरू होते . दिवाळीतील फराळात (Diali Faral)प्रामुख्याने तेल व तुपाचा वापरअधिक होतो तेलामुळे अनेकदा आरोग्याच्या तक्रारी ही उद्भवतात. मात्र, तेल विरहित फराळाचे पदार्थ बनवताही येत नसल्याने नागरिक हे पदार्थ अनेकदा खाणे टाळतात; परंतु यावर उपाय म्हणून शहरात कारागिरांनी आता पदार्थातील तेलाचा (oil)अंश कमी करण्यासाठी हायड्रो डायर यंत्राचा( Hairdo dryer machin )वापर केला आहे या यंत्राच्या वापरामुळे पदार्थ तेलगट लागत नाहीत व खाण्या योग्यही होतात.
Diwali faral :दिवाळी म्हटली की, डोळ्यासमोर येतो आधी फराळ. मात्र, अनेकांना या पदार्थातील तेलामुळे ते खाणे नकोसे वाटतात. मात्र, अजूनही तेलाला पर्याय उपलब्ध न झाल्यामुळे ते पदार्थ तसेच खाल्ले जातात. यासाठी अनेक स्वीट मार्ट (Sweet Mart )विक्रेते हायड्रो डायर गॅलेंडर या यंत्राच्या वापराने फराळातील तेलाचा अंश कमी करत असल्याचे पहावयास मिळते
व्यायाम करा: फराळ बनवताना तेल योग्य तापवणे महत्त्वाचे असते. दिवाळीत गोड फराळ खाणे टाळता येणे शक्य नाही; पण यातून झालेली कॅलरीजची बेरीज व्यायामाच्या माध्यमातून वजाबाकीत बदलणे सहज शक्य आहे. किती कॅलरीज पोटात गेल्या हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे व्यायाम (exercise ) करा. ३० मिनिटं वेगाने चालले तर तुमच्या शरीरातील (human Body)१५० कॅलरीज जळतात.
- Food Tips: पोहे आहेत खूप फायदेशीर, लोह-फायबर सारख्या पोषक तत्वांमुळे मिळतील अनेक फायदे
- Goa Tourism : भारतात गोवा तर परदेशात मालदीव बनलं सर्वाधिक पसंतीचे स्थळ ;” या ” देशांच्याही पर्यटक संख्येत वाढ
- World Mental Health Day : “या ” पद्धतीने ओळखा मानसिक तणावाने त्रस्त असलेल्या रुग्णांना , जाणून घ्या कारणे व उपाय
फराळातील कॅलरीज:
पदार्थ वजन कॅलरी
- तुपाचा लाडू ५० ग्रॅम २५०
- चार चकल्या ६० ग्रॅम २००
- चिवडा २५ ग्रॅम ११०
- बासुंदी एक वाटी २००
- शंकरपाळे ८० ग्रॅम ३५०
- २ काजूकतली ३० ग्रॅम १४०
- चॉकलेट १०० ग्रॅम ४५०
- शेव १० ग्रॅम ५०
- २ अनारसे १०० ग्रॅम ४५०