Jalgaon news : यंदा पावसाळा (rainy season )उशिरा संपला असून, गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली असल्यामुळे सकाळी फिरायला जाताना गरम कपडे, मफलर, कानटोपी वापरताना नागरिक दिसू लागले आहे. तसेच शहरात गरम कपड्यांची दुकानेही (clothes center )उघडण्यास सुरुवात झाली आहे. यंदा गरम कपड्यांमध्ये पारंपरिकसह असंख्य नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध(available in market ) झाले असून यात बुलबुल, फैदर, मखमल वूल या नवीन प्रकारांना खरेदीदारांकडून तसेच ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के या कपड्यांच्या किमती (prize )वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
- Travel Tips: प्रवास करताना आजारपण टाळायचंय “या” सोप्या टिपा ठरतील फायदेशीर ,पहा कोणत्या ते
- Food recipe :स्नॅक्समध्ये बनवा “या ” पद्धतीने “शेंगदाणा भजी” आणि चहासोबत चवीचा आस्वाद घ्या
- Food recipe :हिवाळ्यात चुटकीसरशी बनवा “ही” चविष्ट आणि हेल्दी रेसिपी ;प्रत्येकजण आवडीने खाईल
शिवतीर्थावर तिबेटियन व महाराष्ट्रीयन विक्रेत्यांनी गरम कपड्यांची दुकाने मांडली आहेत. या मध्ये १५० ते ९०० रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध आहेत. तर जॅकेट व इतर काही वेगळ्या प्रकारच्या गरम कपड्यांच्या किमती २ ते ३ हजार दरम्यान पाहायला मिळतात. या वर्षी बाजारात(Market ) जॅकेट, स्वेटर्स, बिनबाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स इ . प्रकारचे गरम कपडे उपलब्ध आहेत; परंतु यात बुलबुल वूल, फैदर वूल, मखमल वूल या प्रकाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मफलर, टोप्या, कानटोप्या, कानपट्ट्याही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शिवतीर्थ मैदानावर दरवर्षी ३५च्या वर महाराष्ट्रीयन व तिबेटियनची दुकाने मांडली जातात. यंदा मात्र, तिबेटियन व्यावसायिकांनी दुकाने उघडण्यास आघाडी घेतली आहे.
“या” कपड्यांना वाढती मागणी : मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या ‘टू इन वन’(to in one ) जॅकेटच्या किमती ६०० ते १ हजार रुपयांपर्यंत तर , महिलांचे कोट ५०० ते ६०० रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स २५० ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध करण्यात आले आहेत. तर लहान मुलांचे जॅकेट्स आणि स्वेटर्सही २५० ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी माकड टोपी आणि कानटोपीला स्थानिक लोकांची जास्त पसंती मिळत आहे. तर महिला वर्गातही स्वेटर्सबरोबर स्कार्फची मागणी यंदा वाढली असल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.