Jalgaon news : काेराेनाचे निर्बंध(corona ) हटल्याने यंदाची दिवाळी सर्वांनीच धूमधडाक्यात साजरी केली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून कापड(clothes ), मिठाई(sweet ), गृहाेपयाेगी इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, फटाके, गिफ्ट(gift) इ . मार्केटमध्ये(market) मोठ्या प्रमाणात उलाढाल पाहायला मिळाली. या सर्व वस्तूंना आकर्षक बनवण्यासह संरक्षणासाठी प्लास्टिक आवरण व बाॅक्सचा वापर केला जाताे. त्यानंतर या सर्व गाेष्टी कचऱ्यात जातात. या गाेष्टींमुळे महापालिकेकडून संकलित केल्या जाणाऱ्या दैनंदिन कचऱ्यात सुमारे वीस टनाची वाढ झाली आहे.
https://www.india.com/marathi/health/
जळगावकरांनी या वर्षी दिवाळी (Diwali festival)दणक्यात साजरी केली. त्या मध्ये गृहाेपयाेगी इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, गॅझेट, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी साडी, ड्रेसेस तयार कपडे, मिठाई, गिफ्ट बाॅक्सेस, फटाके इ . च्या पॅकिंगसाठी पाॅलिथीन , प्लास्टिक(plastic), पुठ्ठ्याचे खाेके यांचा वापर केला जाताे. खरेदी केलेल्या वस्तू घरात आल्यानंतर प्लास्टिक, खाेके कचऱ्यात जातात. हाच कचरा दिवसाला २० टनापर्यंत वाढला आहे. दरम्यान, या वर्षी दिवाळीत मिठाई विक्री साठ टन झाली. कापड बाजारपेठेत दाेनशे काेटी, गिफ्ट बाॅक्स मार्केटमध्ये शंभर काेटी,तर इलेक्ट्राॅनिक्स मार्केटमध्ये दीडशे काेटींची उलाढाल झाली. या मालाच्या पॅकिंगचा कचरा(parking dust) देखील माेठ्या प्रमाणात वाढला आहे.
मागील आठ दिवसांपासून कचरा वाढला
शहरात नियमित कचऱ्याचे प्रमाण सुमारे २८० टनापर्यंत असते. दिवाळीच्या अगाेदर आठ दिवसांपासून त्यामध्ये २० टनाची वाढ झाली असून नंतरही काही दिवस ती कायम असल्याचे महापालिकेचे सहायक आयुक्त अभिजित बाविस्कर यांनी सांगितले.
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच
- Brain Foods: 30+ वयोगटातील लोकांनी “या” पदार्थांचे रोज सेवन करा ,वाढेल स्मरणशक्ती
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
जळगावमध्ये यंदा तब्बल ४ लाख ८० हजार किलाे वजनाच्या फटाक्यांची विक्री
फटाका असाेसिएशनचे कार्याध्यक्ष युसूफ मकरा यांच्या माहितीनुसार यंदा आठ काेटींच्या फटाक्यांची विक्री जळगाव शहरात झाली. पाच हजारांचेे फटाके एका बाॅक्समध्ये येतात. या कार्टूनचे वजन ३० किलाे इतके असते. आठ काेटींचे फटाके म्हणजे प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे १६ हजार कार्टून बसतात. एका कार्टूनचे वजन सुमारे ३० किलाे असल्याने एकूण ४ लाख ८० हजार किलाे वजनाचे फटाके यंदा जळगाव शहरात विकले गेले.फटाक्यांचे बाॅक्स, कागदी व प्लास्टिकचे वेस्टन यांचा कचरा रस्त्यावरच टाकला जाताे. फटाके फाेडल्यानंतर त्यातील दारू जळून राख हाेते.तर कागदी फटाक्यातील काही कागद जळतात. उर्वरित टाकले जातात. राॅकेट आकाशात उडून खाली येऊन पडतात. फुलबाज्या जळाल्यानंतर त्याचे तार कचऱ्यात जातात.तर भुईचक्कर, अनार फाेडल्यानंतर कचऱ्यात जातात. दिवाळीत खरेदी हाेणाऱ्या इतर वस्तूंचे बाॅक्सेस व आवरणाचा कचराही असताे.