Jalgaon market :परतीच्या पावसानंतर हवेत गारवा जाणवू लागला आहे. अशातच जळगाव शहरात थंडी वाढल्याने गावात गरम कपड्यांची दुकाने देखील लावण्यात आली आहे. यंदा गरम कपड्यांमध्ये पारंपरिकसह असंख्य नव नवे प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यात बुलबूल, फैदर, मखमल वूल इ .नवीन प्रकारांना खरेदीरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून यंदा 10 टक्क्यांनी वूलन बाजार महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-shahu-patole-article-about-food-culture-5374278-PHO.html
मखमल वूल प्रकाराला सर्वाधिक पसंती :तिबेटियन (tibetian )व महाराष्ट्रीयन(Maharashtra ) विक्रेत्यांनी गरम कपड्यांची(clothes) अनेक दुकाने थाटली आहेत. यात स्वेटरमध्ये 150 ते 900 रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध केले आहेत. तसेच जॅकेट व इतर काही वेगळ्या प्रकारच्या गरम कपड्यांच्या किमती देखील 2 ते 3 हजार दरम्यान पहायला मिळतात. या वर्षी बाजारात जॅकेट, स्वेटर्स(sweters), लहान मुलांसाठी जॅकेट्स बिन बाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट,इ . प्रकारचे गरम कपडे देखील उपलब्ध आहेत; मात्र यात बुलबूल वूल, फैदर वूल, मखमल वूल या प्रकाराला सर्वाधिक पसंती दिली जात सांगितले. तसेच मफलर, टोप्या, कानटोप्या, कान पट्ट्याही ग्राहकांसाठी येथे उपलब्ध आहेत.
“या “कपड्यांना वाढती मागणी :मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या ‘टु इन वन’(to in one) जॅकेटच्या किंमती (prise)600 ते 1 हजार रुपयांपर्यंत आहे . महिलांचे कोट 500 ते 600 रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स 250 ते 900 रुपयांत उपलब्ध आहेत. लहान मुलांचे जॅकेट्स (jackets for kids)आणि स्वेटर्सही 250 ते 900 रुपयांपर्यंत येथे आहेत. थंडीपासून बचावासाठी माकड टोपी आणि कान टोपीला लोकांची जास्त पसंती मिळत आहे. तर स्वेटर्सबरोबर स्कार्फचीही मागणी यंदा वाढली असल्याचे सांगितले.
- Women in Defense :भारतीय सैन्यातील नारी, शत्रूंवर भारी
- November Travel: नोव्हेंबरमध्ये भेट देण्यासाठी “ही “आहेत भारतातील सर्वोत्तम 5 ठिकाणे एकदा पहाच
- Rise Recipe : भात उरलाय !बनवा “ही” चविष्ट डिश, काही मिनिटांत होईल तयार
35 च्या वर फक्त उबदार कपड्यांची दुकाने :शिवतीर्थ मैदानावर दरवर्षी 35 च्या वर महाराष्ट्रीयन व तिबेटीयन व्यावसायिकांची दुकाने असतात. परंतु यंदा मात्र, तिबेटीयन व्यावसायिकांनी दुकाने(shopes) थाटण्यात आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रीयन दुकानदार अजूनही दुकान थाटण्यात गर्क आहेत .