Jalgaon : जळगावातील ‘हा’ दिग्गज नेता करणार भाजपवापसी, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला

Jalgaon : भाजपातील नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपाला सोडचिठ्ठी (Eknath Khadse Joins BJP) दिलेले दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतत असल्याची माहिती हाती आली आहे. एकनाथ खडसे भाजपात लवकरच परततील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर आज स्वतः खडसे यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला. आज खडसे यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा भाजपात परतत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.

एकनाथ खडसे 40 वर्षांहून आधिक काळ भाजपात काम केले. स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन अशा दिग्गज नेत्यांसमवेत त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवला. पक्षाचा विस्तार केला. आज महाराष्ट्रात भाजपाची जी स्थिती दिसत आहे. त्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात भाजपातील दुसऱ्या फळीती नेत्यांबरोबर त्यांचे खटके उडाले. त्यामुळे नाईलाजाने आपण भाजप सोडत असल्याचे जाहीर करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांचा योग्य मानसन्मान राखत त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. यानंतर राष्ट्रवादीतील फुटीवेळीही त्यांना शरद पवारांनाच साथ देणं पसंत केलं होतं.

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

Jalgaon

आता या पक्षात स्थिरस्थावर होत असतानाच खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात खडसे यांनी या चर्चा नाकारल्या होत्या. भाजपात परतण्याचा कोणताच विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र तरीही या चर्चा काही थांबत नव्हत्या. यानंतर खडसेंच्या दिल्लीवारीचीही मोठी चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनाच पुन्हा रावेर मतदारसंघातून तिकीट दिले.

त्यावेळी महाविकास आघाडीकडून खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे या उमेदवारी असतील अशा चर्चा होती. स्वतः शरद पवार यांनी या दोघांशीही चर्चा केली होती. परंतु, या दोघांनीही रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवारीस नकार दिला होता. तसेच एकनाथ खडसे यांनी तर कितीतरी आधीपासूनच भाजप नेत्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचे बंद केले होते. या सर्व घडामोडी खडसे यांच्या भाजप वापसीकडेच संकेत करत होत्या. परंतु, स्पष्ट काही होत नव्हते. अखेर आज स्वतः खडसे यांनीच याबाबत स्पष्ट माहिती देत चित्र स्पष्ट केले.

Jalgaon

Shirdi Loksabha Election | पदाचा गैरवापर करणाऱ्या लोखंडेंची उमेदवारी धोक्यात; त्या’ प्रकरणी शेतकरी संघटना करणार आंदोलन

याबाबत एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार. खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे यासाठी राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेते त्यांना विनंती करत होते. यानंतर खडसे जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. आता जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का ठरेल. खडसे यांची ताकद पुन्हा भाजपाच्या पाठिशी उभी राहिल.

Leave a Comment