Jalgaon BJP MP Unmesh Patil is going to join ShivSena UBT : राज्यातील महायुतीत जागावाटपाचं घोडं काही ठिकाणी (Unmesh Patil) अडलं आहे. त्यातीलच जळगाव लोकसभा मतदारसंघ आता (Jalgaon Lok Sabha) राज्यात चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात भाजपला अडचणीचा सामना करावा लागत आहे. भाजपने या मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना (Unmesh Patil) उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी भाजपने स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. यामुळे उन्मेश पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. आता त्यांनी देखील भाजपला धक्का देण्याचा प्लॅनिंग केल आहे. या घडामोडीनंतर आज उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) भेट घेतली यानंतर ते उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) देखील भेट घेणार आहेत. (Jalgaon BJP MP Unmesh Patil is going to join ShivSena UBT very soon)
या राजकीय घडामोडीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उन्मेश पाटील भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे. उद्याच त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होईल अशा चर्चाही आता सुरू झाले आहेत. जर राजकीय गणिते जुळून आली आणि उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची आगामी वाटचाल अधिक खडतर होणार आहे.
Unmesh Patil
जळगाव मतदारसंघातून उन्मेश पाटील तिसऱ्यांदा इच्छुक होते परंतु भाजपने यावेळी त्यांना तिकीट दिले नाही. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ या नवीन चेहऱ्याला संधी दिली. या घडामोडीमुळे पाटील काही दिवसांपासून नाराज होते आणि ते कोणत्याही क्षणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात प्रवेश करू शकतात अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. अशातच त्यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली या भेटीनंतर उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करतील या चर्चा अधिक वेगाने सुरू झाले आहेत.
आज प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशबाबत विचारले. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, अनेक वर्ष ते भाजपचे काम करत आहेत. अनेक चळवळींना ते जोडले गेलेले आहेत. त्यांची जनमानसातील प्रतिमा ही चांगली आहे. तरीदेखील भाजपने त्यांना उमेदवारी डावलली याबद्दल निश्चितच आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपामध्ये ते अस्वस्थ आहेत हे मात्र नक्की. ते आम्हाला भेटले आहेत चर्चाही झाली. आता ते उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. याबाबत अधिक माहिती उद्यापर्यंत करू शकेल, अशा सूचक शब्दात संजय राऊत यांनी उन्मेश पाटील यांच्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
Unmesh Patil
Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर उन्मेश पाटील आता कोणत्याही क्षणी ठाकरे प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर उद्या दुपारी साडेबारा वाजता उन्मेश पाटील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली. उन्मेश पाटील यांच्याबरोबरच पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
1 thought on “Unmesh Patil : जळगावात भाजपला धक्का! तिकीट कट होताच ‘हा’ खासदार करणार ठाकरे गटात प्रवेश”