Jaisalmer IAF Aircraft Crash:  Big Breaking! भारतीय हवाई दलाचे विमान जैसलमेरमध्ये कोसळले

Jaisalmer IAF Aircraft Crash : आताची एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा मोठा अपघात ओसाड परिसरात घडला पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला परिसर असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. चांगली बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

CAA द्वारे भारतीय नागरिकत्व मिळणार! ‘या’ वेबसाइटवर करा अर्ज

भारतीय हवाई दलाचे हलके लढाऊ विमान (LCA) तेजस मंगळवारी ऑपरेशनल ट्रेनिंग प्रक्रियेदरम्यान क्रॅश झाले.  विमानातील पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघातानंतर भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली आहे.

MVA मध्ये जागावाटपाचा तिढा कायम, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कोणाला बसणार फटका?

जैसलमेर हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील क्षेत्र आहे भारतीय हवाई दल जैसलमेरमध्ये नियमित लढाऊ ऑपरेशन्स आणि नियमित कवायती करते. वाळवंटी प्रदेश असल्याने लोकवस्तीचे क्षेत्र नाही. याशिवाय, पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत संवेदनशील भागात येते.

Leave a Comment