ITR 2024 : कर्जदारांनो, गृहकर्जातूनही वाचवता येतो कर; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

ITR 2024 : सध्याच्या काळात प्रत्येकाचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते. अशा वेळी अनेकजण घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेत असतात. पण अनेकांना माहिती नसते की त्यांना गृहकर्जावरही कर सवलतींचा लाभ मिळत असतो.

कलम 80C अंतर्गत, तुम्हाला तुमच्या गृहकर्जावरील व्याजावर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. कलम 80E अंतर्गत, तुम्हाला गृहकर्जाच्या व्याज पेमेंटवर कमाल 50,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जाते. गृहकर्जाच्या कर लाभांबाबत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

गृहकर्जावर कर लाभ कसा मिळवायचा

आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत, तुम्हाला एका आर्थिक वर्षात गृहकर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. या सवलतींमुळे कर्जधारकावरील कराचा बोजा कमी होण्यास मदत होते.

समजा करदात्याने त्याने घेतलेल्या गृहकर्जाची मूळ रक्कम बँकेत परत केली तरीही त्याला कर लाभ मिळत असतो हे लक्षात घ्या. या लाभाचा लाभ घेण्यासाठी, करदाता प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत कमाल 1.50 लाख रुपयांचा दावा करता येतो.

समजा तुम्ही या वर्षी घर खरेदी केले असेल तर तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावरील आयकर लाभ घेऊ शकता. तुम्हाला हा लाभ प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत मिळेल. यात तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतचा फायदा घेता येईल.

समजा दोन किंवा अधिक लोकांनी एकत्र गृहकर्ज घेतले असेल म्हणजे संयुक्त कर्ज घेतले असेल, तरीही सरकार त्यांना कर सवलत मिळते. यात व्याजावर 2 लाख रुपये आणि मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येतो.

Leave a Comment