Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. हमास गटाने गाझा सीमेवरून इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये (Gaza) 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली माध्यमांनी सांगितले की आपत्कालीन सेवांनी 260 मृतदेह बाहेर काढले आहेत. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल 500 पॅलेस्टिनी ठार झाले असून 2000 हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलने हमास गटाशी लढण्यासाठी गाझा सीमेवर एक लाख सैनिक पाठवले आहेत.
हमास गटाच्या हल्ल्यात आतापर्यंत 28 परदेशी नागरिकांचा जीव गेल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार यामध्ये नेपाळचे 10, अमेरिकेचे 4, थायलँडचे 12 आणि युक्रेनमधील 2 नागरिकांचा समावेश आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना इस्रायलमधून (Israel) बाहेर काढण्याचे कामही सुरू केले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, हमास गटाने दावा केला आहे की त्यांनी 130 इस्रायली लोकांचे अपहरण केले आहे. त्यांना गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तो या ओलिसांचा मानवी ढाल म्हणून वापर करतील जेणेकरून इस्रायलने हल्ला केला तर त्यांचेच लोक मारले जातील.
या हल्ल्यादरम्यान थायलँड आणि कझाकिस्तानने आपल्या नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढण्याची तयारी केली आहे. पोलँडचे विमान आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी इस्रायलला पोहोचले आहे. त्याच वेळी रोमानियाने आपल्या 800 लोकांना वाचवले आहे. इस्रायलमध्ये 900 हून अधिक आणि गाझामध्ये 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. याव्यतिरिक्त गाझामध्ये 1,00,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. हमासचा दावा आहे की त्याने आणखी 100 इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत देण्याचे बोलले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, “आमची जहाजे आणि लढाऊ विमाने मदतीसाठी इस्रायलच्या दिशेने जात आहेत. आम्ही यूएसएस गेराल्ड आर फोर्ड विमानवाहू नौकेला सतर्क केले आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार इस्रायलमध्ये 7 ते 8 ठिकाणी हल्ले सुरू आहेत. इस्रायलचे कर्नल रिचर्ड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, हमासचे लढवय्ये अजूनही इस्रायलमध्ये घुसत आहेत. संयुक्त राष्ट्राने (UN) म्हटले, की “इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझामधील 1 लाख 23 हजार लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. सुमारे 74 हजार लोक शाळांमध्ये आश्रय घेत आहेत.” 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संगीत महोत्सवावर हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 260 लोक मारले गेले होते.
दरम्यान, तेल अवीवमधील भारतीय दूतावासानुसार इस्रायलमध्ये 18,000 भारतीय राहत आहेत. सध्या ते सर्व सुखरूप आहेत. इस्रायलमध्ये पोहोचलेल्या भारतीय पर्यटकांनी दूतावासाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. सध्या इस्रायलमधील विरोधी पक्षाचे नेते यायर लॅपिड यांनी कबूल केले की सुमारे 500 लोकांचा जीव घेणाऱ्या हमास गटाने केलेला हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे मोठे अपयश आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत संपूर्ण देश एकजूट असल्याचे ते म्हणाले. सध्या राजकारणाचा विचार कुणीही करत नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि युक्रेनने त्यांच्या नागरिकांच्या हत्येची खात्री केली आहे. नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण प्रसाद सौद यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे 17 विद्यार्थी या भागात होते, जिथे हमासने गोळीबार केला.