Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात दोन्ही (Israel Hamas War) बाजूंनी आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास (Israel Attack) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी हानी होत आहे. त्याचवेळी संपूर्ण गाझामध्ये (Gaza) संयुक्त राष्ट्रांच्या आश्रय केंद्रांतील पाणी संपले आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात पाचव्या कॅनेडियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक भयावह होत आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धात दोन्ही बाजूंकडील आतापर्यंत 4,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात 2,670 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 9,600 जखमी झाले आहेत. त्याचवेळी इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1400 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
10 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास या दहशतवादी संघटनेला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी शुक्रवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले होते की ही फक्त सुरुवात आहे. आम्ही हमासला पूर्णपणे संपवू.
इस्रायलचे सैन्य सतत प्रत्युत्तर देत आहे. त्याचवेळी हमासच्या अचानक हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराकडून सातत्याने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायली लष्कराने पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझा सोडून दक्षिण गाझा येथे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांपूर्वी गाझा पट्टीतून दहा लाखांहून अधिक लोकांनी घरे सोडून पलायन केले आहे.
उत्तर गाझामधील उरलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी इस्रायलने गाझावर 5 तास बॉम्बफेक थांबवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो लोक अडकून पडले आहेत. त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी रविवारी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आणि सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्णपणे जगण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली.
10 दिवसात आतापर्यंत काय घडलं?
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी हानी होत आहे. त्याच वेळी संपूर्ण गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयस्थानांमध्ये पाणी संपले आहे. येथील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू आहे. रुग्णालयातील जनरेटरचे इंधन संपल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याची भीती डॉक्टरांना आहे.
इस्रायलने पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे आवाहन केले आहे. इस्त्रायली सैन्याने सांगितले की ते पाच तास दक्षिणेकडील विशिष्ट मार्गाला लक्ष्य करणार नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गाझामध्ये वैद्यकीय पुरवठा, इंधन, शुद्ध पाणी आणि अन्न यासह तातडीच्या मानवतावादी मदतीसाठी आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की उत्तर गाझामधील चार रुग्णालये यापुढे नुकसान झाल्यामुळे कार्यरत नाहीत.
युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अनेक देशांनी सुरू केले आहे. सोमवारी पहाटे 130 जणांना घेऊन थायलँडच्या हवाई दलाचे विमान बँकॉकला पोहोचले. त्याचबरोबर इस्रायलमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले आहे.
इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात कॅनडाचा पाचवा नागरिक ठार झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात उत्तर गाझामधील किमान 1 दशलक्ष लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. या भागातील सुमारे 4,00,000 विस्थापित लोक शाळा आणि इमारतींमध्ये अडकले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 30 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून 13 अन्य नागरिक बेपत्ता झाले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून सुमारे 155 इस्रायली नागरिकांना ताब्यात घेतले. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांमध्ये लहान मुले आणि वृद्ध लोकांचाही समावेश आहे. गाझामध्ये सर्वांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
इस्रायल आता हमास आणि लेबनॉनलाही प्रत्युत्तर देत आहे. इस्रायली लष्कराने रविवारी हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला. इस्रायल-हमास युद्धात अमेरिका इस्रायलला लष्करी आणि आर्थिक मदत करत आहे. त्याचवेळी सर्व पाश्चिमात्य देश इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी एकदा म्हटले आहे की अमेरिका काहीही झाले तरी इस्रायलच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर अमेरिका नेहमीच इस्रायलची ढाल बनून उभी राहील, असेही ते म्हणाले.