Israel Hamas War:  पॅलेस्टिनींवर कहर! जेवणासाठी उभे असणाऱ्या लोकांवर इस्रायली सैनिकांचा गोळीबार; 20 ठार

Israel Hamas War : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल-हमास यांच्या युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मुत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे. मात्र तरीही देखील युद्ध संपत नसल्याने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे.

यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार गाझामध्ये इस्रायली सैनिक नागरिकांवर अत्याचार करत आहे. गाझामध्ये आतापर्यंत इस्रायली सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बॉम्बस्फोटात करण्यात आला आहे. ज्यामध्ये लहान मुलांसह नागरिक बळी पडत आहेत. यामुळे अनेकजण गाझामध्ये मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू पोहोचवत आहे.

मात्र इस्रायली सैनिकांनी मदत घेणाऱ्या नागरिकांना देखील गोळीबारात ठार केलं आहे. सीएनएननुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यात सुमारे 20 लोक ठार झाले आणि 150 हून अधिक जखमी झाले. हे जाणून घ्या कि, इस्रायलकडून हा हल्ला गाझामधील कुवैती क्रॉसरोडवर करण्यात आला आहे. येथे अनेकजण ट्रकच्या मदतीने लोकांसाठी अन्न घेऊन येतात.

मृतांची संख्या वाढेल

अल शिफा रुग्णालयाच्या आपत्कालीन युनिटचे डॉक्टर मोहम्मद गरब यांनी सांगितले की मृतांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे कारण मृतांना अद्याप रुग्णालयात हलविले जात आहे.  सीएनएन दिलेल्या माहितीनुसार  घटनास्थळावरील एका साक्षीदाराने सांगितले की या धक्कादायक घटनेमध्ये 12 जणांचा मुत्यू झाला आहे तर  ‘गाझामधील कुवैती चौकात मानवतावादी मदतीची वाट पाहत असलेल्या नागरिकांच्या गटाला इस्रायली सैन्याने टार्गेट करून हल्ला केला असं वर्णन या घटनेचा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

इस्रायलला जबाबदार धरले

घटनास्थळावरील साक्षीदारानुसार, या भागात इस्रायलने टँक फायरने हल्ला केला. तर या हल्ल्यानंतर गाझा नागरी संरक्षण प्रवक्ते महमूद बस्सल यांनी एक निवेदन जाहीर करत या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले असल्याची माहिती सीएनएनने दिली आहे.

समुद्रमार्गे मदत पोहोचेल 

महमूद बस्सल यांनी सीएनएनला माहिती दिली कि, सध्या उत्तर गाझा पट्टीत पडलेल्या दुष्काळामुळे अनेकजण मदतीची प्रतीक्षा करत आहे मात्र इस्रायली त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करत आहे.

तर दुसरीकडे इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच समुद्रमार्गे मानवतावादी मदत गाझामध्ये प्रवेश  करणार आहे. इस्रायलच्या आक्रमक हल्ल्यानंतर देखील मानवतावादी मदत जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे गाझापर्यंत पोहोचत आहे.

370 पर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ‘या’ राज्यांवर विशेष नजर; तयार केला मास्टर प्लॅन

युद्ध सुरु झाल्यापासून प्रथमच  समुद्रमार्गे मानवतावादी मदत गाझापर्यंत पोहोचणार आहे. WCKitchen कडून मानवतावादी मदत घेऊन जाणारे UAE-अनुदानीत जहाज गाझासाठी रवाना झाले आहे.

Leave a Comment