Israel Hamas War : गाझा हादरलं! मदतीच्या प्रतिक्षेतील लोकांवर इस्त्रायलचा हल्ला; ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : पाच महिने उलटून गेले तरीही इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) थांबलेलं नाही. हमासने इस्त्रायलवर हल्ले करून या युद्धाला तोंड फोडलं. परंतु, आता इस्त्रायल हमासचा (Israel Attack) नायनाट करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरला आहे. गाझा शहरात सातत्याने (Gaza City) हल्ले केले जात आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरे उद्धवस्त झाली (Hamas War) आहेत. आताही भीषण हल्ल्याची बातमी गाझातून आली आहे. मदतीच्या प्रतिक्षेत थांबलेल्या पॅलेस्टिनींवर इस्त्रायलने (Israel Palestine Conflict) हल्ला केला. या हल्ल्यात 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

गुरुवारी गाझा शहरात मदतीची वाट पाहत असलेल्या पॅलेस्टिनींच्या जमावावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक ठार आणि जखमी झाले. स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शिफा हॉस्पिटलमधील नर्सिंग विभागाचे प्रमुख डॉ. शफई यांनी अल जझीरा नेटवर्कला सांगितले की, सुमारे 50 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले. त्यांनी नेमका मृतांचा आकडा सांगितला नाही. या हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Pakistan Financial Crisis : कंगाल पाकिस्तानला दिलासा! ‘या’ देशाने केली मोठ्ठी मदत, जाणून घ्या..

Israel Hamas War

इस्रायली सैन्याने सांगितले की ते या अहवालांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांना “शेकडो” लोक जमिनीवर पडलेले आढळले. ते म्हणाले की सर्व मृत आणि जखमींना गोळा करण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका नाहीत त्यामुळे मिळेल त्या साधनाने जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम केले जात आहे.

Israel Hamas War

आणखी एका रुग्णालयाचे डॉ. सल्हा यांनी सांगितले की, या हल्ल्यांत 90 लोक जखमी झाले आणि तिघांचा मृत्यू झाला. रिसेप्शन आणि आपत्कालीन कक्षांमध्ये अजूनही बरेच जखमी आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मयतांची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंद आहे, वीज नाही आणि ऑपरेटिंग रूम बॅटरीच्या उर्जेवर चालत आहे आणि फक्त काही तास शिल्लक आहेत. इस्रायल-हमास युद्धानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर गाझाचे आरोग्य क्षेत्र गंभीर स्थितीत आहे आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवत आहे.

World Population : ‘या’ देशांची लोकसंख्या घटली; सरकारचंही वाढलं टेन्शन, पहा, काय घडतंय?

Leave a Comment