Israel Hamas War : पाकिस्तानचा डाव, इस्त्रायलविरोधात प्रस्ताव; भारतानेही केलं ‘हे’ मोठं काम

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यात अजूनही युद्ध सुरू (Israel Hamas War) आहे. या युद्धामुळे इस्त्रायलचे मोठे नुकसान झाले आहे तसेच पॅलेस्टाइनलाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबविण्यासाठी जगातील अनेक देशांकडून दबाव आणला जात आहे परंतु हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण बिमोड करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेला इस्त्रायल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे अशातच आता इस्त्रायल विरोधी देशांनी इस्त्रायलला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत इस्त्रायल विरोधातील ठराव आणण्यात आला. गाझामध्ये इस्त्रायलने युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केले आहेत. त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे, असे या प्रस्तावात म्हटले होते. हा प्रस्ताव आयओसीमार्फत पाकिस्तानने आणला होता. मात्र भारतासह 13 देशांनी संयुक्त राष्ट्रात आणलेल्या या प्रस्तावापासून दूर राहणेच पसंत केले.

Israel Hamas War

गाझामधील बिघडलेल्या परिस्थितीवर 28 देशांनी संयुक्त राष्ट्रात इस्त्रायल विरोधात आणलेल्या ठरावाच्या बाजूला मतदान केले तर 13 देशांनी यापासून दूर राहणे पसंत केले. प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशांची संख्या 6 होती. या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि जर्मनी यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत एकूण 47 देश सदस्य आहेत. या गटात समाविष्ट असलेले बहुतेक देश लोकशाही प्रणाली आणि मानवी हक्कांचे पालन करतात.

Israel Hamas War : गाझा हादरलं! मदतीच्या प्रतिक्षेतील लोकांवर इस्त्रायलचा हल्ला; ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आलेल्या प्रस्तावात इस्त्रायलवर शस्त्रास्त्रबंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सर्व देशांनी इस्त्रायलला शस्त्रास्त्रे आणि इतर लष्करी साहित्याची विक्री किंवा हस्तांतरण बंद करावे यावर भर देण्यात आला होता. असे केल्यानेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन आणि मानवाधिकारांचा गैरवापर थांबेल असे या प्रस्तावात म्हटले होते. गाझामध्ये इस्रायल सैन्याने केलेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी इस्त्रायललाच जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार आयओसी संघटनेच्यावतीने हा प्रस्ताव पाकिस्तानने आणला होता. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी इस्त्रायलला दोषी सिद्ध करण्यासाठी आयओसी संघटना अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. गाझामध्ये हमाससोबत सुरू असलेल्या युद्धावर पाकिस्तानकडून इस्त्रायलवर सातत्याने टीका केली जात आहे.

Israel Hamas War

दरम्यान, भारताबरोबरच जॉर्जिया आण् जपान या देशांनी या ठरावावरील मतदानात भाग घेतला नाही. तसे पहिले तर हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर या युद्धाला तोंड फुटले. यानंतर इस्त्रायलने या दहशतवादी संघटनेचा पूर्ण बिमोड करण्याचा विडा उचलला आणि त्यानुसार गाझामध्ये जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली.

Russia Ukraine War : दोन आठवड्यांत देश सोडा; युद्धग्रस्त रशिया-युक्रेनच्या नागरिकांना ‘या’ देशाचा आदेश

अजूनही गाझा भागात इस्त्रायलकडून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे युद्धाची दाहकता वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत इस्त्रायल माघार घेण्यास तयार नाही त्यामुळे युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगातील अन्य देशांकडून युद्ध थांबवावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु त्यांना या प्रयत्नात यश येताना दिसत नाही.

Leave a Comment