Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास संघटना यांच्या दरम्यान मागच्या नऊ दिवसांपासून सुरू युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
यातच इस्रायलने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या सुमारे 11 लाख लोकांना परिसर रिकामा करून दक्षिण गाझाकडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वृत्तसंस्था एपीने वृत्त दिले आहे की, इस्रायली लष्कराने दिलेल्या सूचनांचे पालन करून पॅलेस्टिनींनी शुक्रवारी उत्तर गाझामधून मोठ्या प्रमाणावर पलायन केले आहे.
त्याचवेळी इस्रायलने उर्वरित लोकांना हा परिसर सोडण्यासाठी सहा तासांचा अल्टिमेटम दिला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षित हालचालीसाठी गाझानांना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ दिली जाईल.
इस्रायली सैन्याच्या या आदेशानंतर, संयुक्त राष्ट्राने इशारा दिला की गर्दीच्या गाझामधील जवळपास निम्म्या लोकसंख्येला स्थलांतरित करणे विनाशकारी असेल. यादरम्यान संयुक्त राष्ट्रानेही इस्रायलला आपला आदेश मागे घेण्याचे आवाहन केले.
उत्तर गाझा सोडून देण्याचे आवाहन, इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी गाझा शहराभोवती हमासच्या भूमिगत तळांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. त्याचवेळी हमासने इस्रायली लष्कराच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.
उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या सुमारे 11 लाख लोकांनी उत्तर गाझा सोडून दक्षिण गाझामध्ये जावे, असे इस्रायली लष्कराने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राला कळवले होते.
सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी सांगितले की, लष्कराने गुरुवारी मध्यरात्रीपूर्वी संयुक्त राष्ट्रांना सांगितले की उत्तर गाझातील संपूर्ण लोकसंख्या पुढील 24 तासांत दक्षिण गाझामध्ये हस्तांतरित करावी.
इस्रायलने शुक्रवारी गाझावर हवाई हल्लेही केले, त्यामुळे गाझा शहराबाहेरील मुख्य रस्त्यावर लोकांची झुंबड उडाली.
त्याच वेळी, गाझा आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत 1,900 लोक मारले गेले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोक 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.