Israel Attack : इस्रायलवर हमासने (Israel Attack) 5 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायल सरकारने म्हटले आहे. या घटनेनंतर इस्त्रायलचे (Israel Attack) पीएम बेंजामिन नेतन्याहू यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.आम्ही युद्धात आहोत आणि हमासला (Hamas) याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे पीएम नेतन्याहू यांनी म्हटले आहे. हे वक्तव्य पंतप्रधानांनी एका व्हिडिओद्वारे जारी केले आहे.
7 ऑक्टोबरच्या सकाळपासून गाझामधून (Gaza) इस्रायलच्या निवासी भागावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलमध्ये घुसून अतिरेकी संघटना हमासने हे लक्ष्य केले आहे. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. आज इस्रायलमध्ये सुट्टी होती. त्यामुळे तेथील लोक त्यांच्या सणाचा आनंद लुटत होते. मात्र, सकाळपासूनच गाझा येथून सातत्याने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या घटनेत 22 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मोठी किंमत मोजावी लागेल
हमासच्या या हल्ल्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी निवेदन जारी केले आहे. या व्हिडिओद्वारे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला धमकी दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपण युद्धात जगत आहोत. ही काही छोटी घटना नाही. सकाळपासून हमास इस्त्रायली नागरिकांवर प्राणघातक हल्ले करत आहे. शत्रूला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आम्ही युद्धात आहोत आणि हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू. त्यांनी हे युद्ध सुरू केले आणि आम्ही ते संपवू.
सैन्याला सूचना
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सुरक्षा प्रमुखांशी चर्चा केली आहे. घुसखोरी करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करून स्वच्छता मोहीम पूर्ण करावी, असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. यासोबतच शत्रूला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याच्या सूचनाही लष्कराला देण्यात आल्या आहेत, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.
पीएम मोदींनीही केलं ट्विट
रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine War) आता आणखी एक युद्ध सुरू झाले आहे. यावेळी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. हमासने शनिवारी गाझा पट्टीतून रॉकेट आणि बॉम्ब फेकले. या हल्ल्यात 40 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
इस्रायल-हमास युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने आपल्याला खूप धक्का बसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.