अहमदनगर : तालुक्यातील इसळक गावातील ज्येष्ठ महिला व्यक्तिमत्त्व तुळसाबाई सुखदेव गेरंगे ह्यांचे बुधवारी (दि. 11 जानेवारी 2023) रात्री 1 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 90 वर्षांच्या होत्या.
तुळसाबाई परिसरात ‘काळूबाई’ नावाने सर्वपरिचित आहेत. त्या प्रेमळ सुस्वभावी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून पडल्या होत्या. अखेरीस हा संघर्षमय प्रवास आज थांबला. त्यांच्या जाण्याने इसळक-निंबळक परिसरातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्रसिद्ध हाडांचे वैद्य आणि माजी पोलीस पाटील सुखदेव गेरंगे पाटील ह्यांच्या त्या पत्नी होत. तसेच इसळक निंबळक सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी गेरंगे ह्यांच्या मातोश्री असून सरपंच संजय गेरंगे ह्यांच्या त्या चुलती होत्या. इसळक स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते आणि त्यांचे नातू संदीप पाटील गेरंगे ह्यांनी दिली आहे.