ISIS Sambhajinagar । खळबळजनक! विद्यार्थ्यांवर ISIS चे जाळे, ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ मधून धक्का देणारी माहिती समोर

ISIS Sambhajinagar । राज्याला एक धक्का देणारी माहिती समोर आली आहे. ISIS च्या जाळ्यात आता विदयार्थी देखील अडकले आहेत. याबाबत 50 हून अधिक तरुणांसह एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता, असे तपासात आढळून आले आहे.

याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजे NIA ने मुंबई विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ISIS च्या दहशतवादी कटात लिबियन नागरिकासह दोन आरोपींची नावे आहेत, याबाबत एका अधिकाऱ्याने माहिती शुक्रवारी दिली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

NIA ने या वर्षाच्या सुरुवातीला (फेब्रुवारी 2024) अटक केलेल्या महाराष्ट्रातील एम जोहेब खान आणि लिबियन एम. शोएब खान यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका मॉड्यूलशी ISIS च्या जागतिक नेटवर्कशी संबंधीत दहशतवादी कटातील प्रमुख सूत्रधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतात ISIS च्या नापाक कारवाया पुढे नेण्यासाठी आणि कट्टरपंथीय बनवण्याच्या हेतूने झोहेबने छत्रपती संभाजीनगरमधील 50 पेक्षा जास्त तरुणांसह एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता, असेही या तपासात समोर आले आहे. जोहेबला शोएबने भरती केले असून त्यांनी ISIS च्या भारतविरोधी अजेंड्याला चालना देण्यासाठी, देशभरातील संवेदनशील प्रतिष्ठानांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा कट रचला आहे.

विशेष म्हणजे एनआयएच्या विशेष न्यायालयासमोरील आरोपपत्राने आयएसआयएस/आयएसच्या परदेशातील हँडलर्सचा सहभाग असलेल्या कटाचे आंतरराष्ट्रीय संबंध उघड केले असून एनआयएच्या तपासात झोहेब आणि शोएब यांचा समावेश असलेल्या भारतविरोधी कारवायांचे जाळे पूर्वीच उघड झाले आहे, ज्यांनी ISIS च्या स्वयं-अभिषिक्त खलिफाकडे ‘बयथ (निष्ठा शपथ)’ घेतली होती.

Leave a Comment