IRCTC : लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. ज्याचा त्यांना खूप फायदा होत असतो. रेल्वेदेखील आपल्या प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. तिकीट बुकिंग रिफंडवर प्रवाशांना फायदा मिळणार आहे.
रिफंड सेवेला गती देण्यासाठी आयआरसीटीसी मध्य रेल्वेच्या माहिती प्रणालीसोबत काम करत आहे, असे अहवालातुन स्पष्ट झाले आहे. वापरकर्त्यांना फक्त 1 तासात तिकिटाचे पैसे परत मिळतील. ही परतावा रक्कम 2 ते 3 दिवसात संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते.
हे लक्षात घ्या की IRCTC वरून तिकीट बुक करताना, वापरकर्त्याला नाममात्र शुल्क भरणे गरजेचे असते. हे शुल्क 1 तासाच्या आत परत मिळाल्यावरही मिळणार नाही. तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तिकीट बुकिंगच्या वेळी IRCTC तुमच्याकडून आकारत असलेल्या नाममात्र शुल्काचा परतावा तुम्हाला मिळणार नाही. प्रणालीमध्ये बदल करून आणि डिजिटल प्रक्रियेद्वारे, तिकीट रद्द झाले तर किंवा तिकीट बुक नाही झाले तर परताव्याची प्रक्रिया तासाभरात पूर्ण केली जाऊ शकते.
असा घ्या परतावा
प्रवाशाला काही विशिष्ट परिस्थितीत परतावा घ्यायचा असल्यास तिकीट ठेव पावती (टीडीआर) द्वारे दावा केला जाईल. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येते. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर टीडीआर दाखल करणाऱ्यांना अवघ्या 1 तासात सर्व प्रकारचे रिफंड देण्यात येते. यासाठी, परताव्याशी निगडित माहिती थेट IRCTC च्या निरीक्षकांना पाठवली जाईल जेणेकरुन परतावा प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होते.
कधी मिळतो परतावा? जाणून घ्या
भारतीय रेल्वेकडून तुमचे पैसे परत मागण्याची अनेक कारणे असतात. समजा तुम्ही तिकीट बुक केले नसेल आणि बँक खात्यातून पैसे कापले गेले असतील तर परतावा मिळण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर जर ट्रेन रद्द झाली असेल किंवा बुकिंगमध्ये काही अडचण येत असेल किंवा ट्रेन उशिराने धावत असेल आणि अशा वेळी तिकीट रद्द झाले असेल, तर तुम्हाला परतावा मिळेल.