iQube ST : TVS ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! 2 तासात होते चार्ज, किंमत आहे फक्त…

iQube ST : तुम्हाला नवीन स्कुटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता TVS ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. जी 2 तासात चार्ज होते.

ही स्कूटर अनेक चांगल्या फीचर्सने सुसज्ज असून ही शानदार स्कूटर अशा लोकांना लक्षात घेऊन तयार केली आहे जे बजेट सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर शोधत आहेत. जाणून घेऊया या स्कूटरचे फीचर्स.

बॅटरी आणि रेंज

TVS iQube ST ला 2.2 kWh बॅटरी पॅक मिळत असून ही स्कूटर फक्त 2 तासात 80% पर्यंत चार्ज होते. त्याचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितास असून 950W चार्जरला सपोर्ट करते. विशेष म्हणजे ही स्कूटर क्रॅश होण्यापूर्वी किंवा पडण्यापूर्वी तुम्हाला अलर्ट करते.

ही एक चांगली इलेक्ट्रिक स्कूटर असून ती सुरक्षिततेपासून अनेक चांगल्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. कमी श्रेणीच्या या स्कूटरमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. ही स्कूटर तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजसाठी वापरू शकता. ही स्कूटर फुल चार्ज केली तर 75 किमीची रेंज देते.

जाणून घ्या फीचर्स

या स्कूटरमध्ये 5 इंच TFT डिस्प्ले दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक चांगले फीचर्स मिळतील. ही स्कूटर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनने सुसज्ज असून त्यात किती बॅटरी शिल्लक आहे याचीही माहिती उपलब्ध होते.

त्याच्या सीटखाली 30 लिटर जागा असणार आहे. हे लक्षात घ्या की या स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतात ही स्कूटर थेट ओला इलेक्ट्रिक आणि एथर इलेक्ट्रिक स्कूटरला देईल. पण TVS iQube ST ही सर्वांत चांगली दिसणारी स्कूटर आहे.

Leave a Comment