iQOO Z9 5G । लवकरच लाँच होणार iQOO Z9 5G, मिळेल 50 हजार रुपये जिंकण्याची संधी

iQOO Z9 5G । भारतीय बाजारात iQOO चे अनेक स्मार्टफोन आहेत. प्रत्येक फोनमध्ये कंपनी वेगवेगळे, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देत असते. प्रत्येक मॉडेलची किंमत वेगळी असते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही फोन शकता.

जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात लवकरच कंपनीचा iQOO Z9 5G हा फोन लाँच होणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला 50 हजार रुपये जिंकण्याची संधी मिळत आहेत.

iQOO च्या प्रोफाइलमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. या कंपनीने आपल्या व्यवसायाची सुरुवात Vivo चे सब-ब्रँड म्हणून केली. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर या स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे. या मायक्रोसाइटवर चिपसेट, कॅमेरा स्पेसिफिकेशन आणि डिझाइनची माहिती उपलब्ध आहे.

ॲमेझॉनच्या मायक्रोसाइटवर स्पिन अँड विन गेम दिला आहे, ज्यात तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी मिळत आहे. ही शिल्लक Amazon Pay मध्ये दिली जाईल. तुम्ही Play Now वर क्लिक करून ते प्ले करू शकता.

iQOO Z9 5G कॅमेरा आणि चिपसेट

या आगामी स्मार्टफोनच्या प्रोसेसरची पुष्टी iQOO ने केली असून या फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट वापरला आहे. iQOO चा दावा आहे की या स्मार्टफोनने AnTuTu वर 734K स्कोअर पॉइंट्स मिळवले आहेत.

रॅम

iQOO Z9 5G स्मार्टफोनचा बॅक पॅनल मायक्रोसाइटवर दाखला आहे, ज्यावरून या स्मार्टफोनची रचना आणि कॅमेराची रचना स्पष्टपणे पाहता येते. गीकबेंच सूचीनुसार, हा फोन 8GB रॅम आणि Android 14 आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल.

ड्युअल रियर कॅमेरा सेटअप

हा iQOO Z सीरीजचा पहिला स्मार्टफोन असून यात Sony IMX882 सेन्सर वापरला आहे. इमेज पाहता हे कळते की या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅश लाईट दिली आहे. iQOO च्या या फोनमध्ये हिरव्या रंगाचा टेक्सचर्ड पॅटर्न वापरला आहे.

Leave a Comment