iQOO Smartphone : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. बाजारात iQOO आपला नवीन फोन लाँच करणार आहे. तुमच्यासाठी हा फोन उत्तम पर्याय असू शकतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे लक्षात घ्या की iQOO ला भारतात चार वर्षे पूर्ण होत असताना, ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निपुम मौर्या यांनी सोशल मीडिया चॅनेलवर iQOO 12 ॲनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केले जाईल. या फोनच्या लॉन्चची तारीख येत्या काही आठवड्यांत समोर येईल. रिपोर्ट्सनुसार, हा फोन लाल रंगात सादर केला जाणार आहे. तो चीनी बाजारात अगोदरच लॉन्च केला आहे.
iQOO 12 फ्लॅगशिप फोनचे फीचर्स
चीनी स्मार्टफोन निर्मात्याच्या फ्लॅगशिप फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच AMOLED डिस्प्ले असून iQOO 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 3 प्रोसेसर प्रदान केला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. गेमिंग दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुपर कॉम्प्युटिंग चिप-क्यू1 फोनचा एक भाग बनवला आहे.
iQOO 12 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, यात 50MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर सोबत 50MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि 64MP टेलिफोटो सेन्सर दिला आहे. हा फोन 100x डिजिटल झूम आणि एकाधिक कॅमेरा मोड ऑफर करतो. याच्या 5000mAh बॅटरीला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
iQOO फ्लॅगशिप फोनची किंमत
iQOO भारतात कंपनीच्या वेबसाइटशिवाय तुम्ही ते Amazon वरून खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर त्याची सुरुवातीची किंमत 52,999 रुपये ठेवली आहे.