IPO Breaking : आज ग्लोबल हेल्थ (Global health) आणि बिकाजी फूड्सचा (Bikaji foods) हे दोन आयपीओ (IPO) उघडले गेले आहेत. ७ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदार (Investor)या दोन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू शकता. ग्लोबल हेल्थ लिमिटेड (Global health limited) मेदांता ब्रँड (Medanta brand) अंतर्गत हॉस्पिटल (Hospita) चालवते, तर बिकाजी हा देशातील प्रतिष्ठित एफएमसीजी (FMCG) (भुजिया आणि नमकीन) ब्रँड (Brand) आहे. ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दोन्ही कंपन्यांच्या आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करता येईल.

बिकाजी फूड्स (Bikaji foods) आयपीओची (IPO) बँड किंमत रु. २८५ ते ३०० च्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ९०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. आयपीओ अंतर्गत २.९४ कोटी शेअर्स विकले जातील. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये बिकाजी फूड्सचे शेअर्स ७१ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. कंपनीचे शेअर्स १६ नोव्हेंबरला बाजारात लिस्ट होऊ शकतात. त्याचवेळी, गुंतवणूकदारांना ११ नोव्हेंबर २०२२ रोजी शेअर्सचे वाटप केले जाऊ शकते.
ग्लोबल हेल्थ लिमिटेड (Global health limited), जे मेदांता ब्रँड नावाखाली रुग्णालये चालवते आणि व्यवस्थापित करते.  २,२०६ कोटी आयपीओसाठी प्रति शेअर ३१९-३३६ रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीची प्रारंभिक शेअर विक्री ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान उघडली जाईल. आयपीओद्वारे पाचशे कोटींचे नवीन शेअर्स (Shares) जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ५.०८ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (Offer for sales) विकले जाणार आहेत. तज्ज्ञांच्या मते ग्लोबल हेल्थचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये (Gray market) १९ रुपयांच्या प्रीमियमवर (Premier) उपलब्ध आहेत. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर शेअर बाजारात (Share market) सूचीबद्ध केले जाऊ शकतात.

Share.

Leave A Reply

Exit mobile version