Rohit Sharma’s Records in IPL : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी (Rohit Sharma) 36 वर्षांचा झाला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या फलंदाजीच्या पराक्रमाने जगभरात नाव कमावले आहे.
तो सध्या आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. 2013 मध्ये रोहित शर्माला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले. म्हणजेच यंदा दहाव्यांदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. या 10 वर्षांत या संघाने आतापर्यंत एकूण पाच विजेतेपदे जिंकली आहेत.
6 हजार रन्स
2023 मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला. आयपीएलमध्ये 6000 हजारांहून अधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
यशस्वी कर्णधार
रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. MI चे नेतृत्व करताना रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये संघाला विजेता बनवले आहे. आयपीएलच्या इतिहासात एक खेळाडू म्हणून सहा आयपीएल विजेतेपद जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. रोहितनंतर दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे, ज्याने चेन्नईचे नेतृत्व करताना 4 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
प्रत्येक हंगामात अर्धशतक
IPL ची सुरुवात 2008 साली झाली. रोहित सुरुवातीची काही वर्षे डेक्कन चार्जर्सचा भाग होता. वास्तविक, आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळल्या गेलेल्या सर्व सत्रांमध्ये रोहितने एका किंवा दुसर्या सामन्यात निश्चितपणे अर्धशतक केले आहे. रोहितशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने हा पराक्रम केला नाही.
हॅटट्रिक केली आहे
रोहित शर्माची झंझावाती फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे, पण काही वर्षांपूर्वी रोहित शर्माही एक उत्तम फिरकी गोलंदाज होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याने आयपीएलमध्ये हॅटट्रिकही केली आहे. जो पराक्रम आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजही करू शकले नाहीत, ते हिटमॅनने गोलंदाजी करताना केले आहे.
2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहितने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. त्याने सलग तीन चेंडूत अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनीला बाद केले. याशिवाय आयपीएलमध्ये शतक आणि हॅटट्रिक घेणारा तो पहिला फलंदाज आहे.
सर्वात खराबही रोहितच्या नावावर
आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माने आणखी एक विचित्र रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे, जो कोणत्याही फलंदाजाला पाहायला आवडणार नाही. खरं तर, या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा 1 धावा करून बाद झाला.
यासह रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात 0-5 धावा दरम्यान सर्वाधिक बाद होणारा फलंदाज ठरला. तो आयपीएलमध्ये 0 ते 5 या दरम्यान 50 वेळा बाद झाला आहे. रोहितनंतर दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो 44 वेळा 0-5 रन्समध्ये बाद झाला आहे.