Mumbai Indians beats Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा (Mumbai Indians beats Lucknow Super Giants) दणदणीत पराभव केला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 मध्ये जागा पक्की केली आहे. येथे आता गुजरात विरुद्ध सामना होईल.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 182 रन केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची दमछाक झाली. ठराविक अंतरावर विकेट्स पडत राहिल्या ज्यामुळे 16.3 ओव्हरमध्ये अख्खा संघ बाद झाला. संघाला फक्त 101 धावाच करता आल्या. लखनऊचा संघ सलग दुसऱ्या वेळेस एलिमिनेटरमधून बाहेर पडला आहे. याआधी मागील आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनऊचा पराभव केला होता.
मुंबईकडून कॅमरन ग्रीन याने सर्वाधिक 41 रन केले. कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा मात्र 11 रन करून बाद झाला. ईशान किशननेही फक्त 15 रन केले. पावरप्ले मध्ये संघाने 62 रन केले होते. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आणि ग्रीन या दोघांनी 66 धावांची भागीदारी केली. 11 ओव्हरमध्ये मात्र दोघेही बाद झाले.
सूर्यकुमारने 20 चेंडूत 33 तर ग्रीनने 23 चेंडूत 41 रन केले. यानंतर मात्र अन्य खेळाडूंना वेगवान खेळ करता आला नाही. तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी 43 धावांची भागीदारी केली. यानंतर संघाने 20 ओव्हर्समध्ये 182 रन केले.
त्यानंतर लखनऊला मात्र या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. आकाश मधवाल यांनी घेतलेल्या पाच विकेट्समुळे लखनऊचा 81 रनांनी पराभव झाला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. येथे आता त्यांचा सामना गुजरात टायटन्सबरोबर होणार आहे.