IPL 2023 : आयपीएल (IPL) स्पर्धेत आज जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात राजस्थानच्या संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसनने 20 चेंडूत 30 धावा केल्या, ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. संजू सॅमसनने या सामन्यात कर्णधार म्हणून विशेष कामगिरी केली. त्याने राहुल द्रविडचा (Rahul Dravid) विक्रम मोडला.
खरे तर, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाला पूर्ण 20 ओव्हर्सही खेळत्या आल्या नाहीत. 17.5 ओव्हर्समध्येच अख्खा संघ बाद झाला. फक्त 118 धावा करता आल्या. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने 14 धावांची खेळी केली. जोस बटलरने 8 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने 30 धावांची खेळी खेळली, ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार म्हणून 41 वा सामना खेळला. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून 40 सामने खेळले. अशा परिस्थितीत संजू सॅमसनने हा विक्रम मोडला आहे. स्टीव्ह स्मिथने 27 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे.
राजस्थान रॉयल्सचे कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने
शेन वॉर्न – 56 सामने
संजू सॅमसन – 41 सामने
राहुल द्रविड – 40 सामने
स्टीव्ह स्मिथ – 27 सामने
अजिंक्य रहाणे – 24 सामने
शेन वॉटसन – 21 सामने