IPL 2023 : उद्यापासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.जगातील सर्वात प्रसिद्ध टी-20 लीगपैकी एक असलेल्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा जोरदार पाऊस पडतो. गोलंदाजांची चांगलीच धुलाई होते. चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्यास मिळते. आताही ते घडणार आहे. मात्र त्याआधी आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार कुणी मारले याची माहिती घ्यायला तुम्हाला आवडेला ना, चला तर मग आज जाणून घेऊ की आयपीएलममध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोण आहेत.
1. ख्रिस गेल
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमात ख्रिस गेलचे (Chris Gayle) नाव आघाडीवर आहे. गेलने सुरुवातीपासूनच आपल्या झंझावाती फलंदाजीने या लीगमध्ये चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या 142 सामन्यांमध्ये गेलने 357 षटकार मारले आहेत. गेलशिवाय कोणत्याही फलंदाजाला 300 हून अधिक षटकार मारता आलेले नाहीत.
2. एबी डिव्हिलियर्स
मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स या लीगमधील स्फोटक फलंदाजीसाठी भारतीय चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत गेलनंतर डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. एबीने आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 184 सामन्यांमध्ये एकूण 251 वेळा षटकार मारले आहेत.
3. रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार रोहित शर्माची बॅटही या लीगमध्ये चांगलीच बोलली आहे. हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 227 सामन्यांमध्ये 240 षटकार ठोकले आहेत.
4. एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी या लीगमधील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये गणला जातो. सामना हाताळण्याचे तसेच सामना पूर्ण करण्याचे कौशल्यही धोनीला चांगले माहीत आहे. यामुळेच आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. CSK कर्णधाराने IPL मध्ये खेळलेल्या 234 सामन्यांमध्ये एकूण 229 षटकार ठोकले आहेत.
5. किरॉन पोलार्ड
किरॉन पोलार्ड या फॉरमॅटचा सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पोलार्डनेही अनेक सामन्यांत मुंबई इंडियन्सला एकहाती विजय मिळवून दिला आहे. पोलार्ड जेव्हा त्याच्या रंगात असतो तेव्हा त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे नसते.
आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 189 सामन्यांमध्ये पोलार्डने 223 षटकार ठोकले आहेत. मात्र, वेस्टइंडिजच्या स्टार फलंदाजाने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्याने पोलार्डची स्फोटक फलंदाजी यंदा पाहायला मिळणार नाही.