IPL Final 2023: पुन्हा एकदा IPL विजेतेपद CSK ने पटकावला आहे. काल रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे.
या विजयासह CSK संघाने आपल्या एका दिग्गज खेळाडूला विजयासह निरोप दिला. या खेळाडूने सामन्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. अंतिम सामन्यात या खेळाडूने छोटी पण स्फोटक खेळी करत चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायडूच्या IPL कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. अंतिम सामन्यापूर्वीच अंबाती रायडूने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली होती. अंतिम सामन्यात अंबाती रायडूच्या बॅटने स्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने 8 चेंडूत 237.50 च्या स्ट्राईक रेटने 19 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले.
अंबाती रायडू भावूक
अंतिम सामना जिंकल्यानंतर अंबाती रायडू म्हणाला, ‘हा एका कथेचा शेवट आहे. मी जास्त मागू शकलो नसतो. मी एका महान संघासाठी खेळलो हे माझे भाग्य आहे. मी आता आयुष्यभर हसू शकतो. गेल्या 30 वर्षात मी केलेल्या सर्व परिश्रमांमुळे मला आनंद आहे की मी हे असेच संपवू शकलो. मला माझ्या कुटुंबाचे, माझ्या वडिलांचे मनापासून आभार मानायचे आहेत. त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते.
सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली होती
अंबाती रायडूने 28 मे रोजी ट्विट करत लिहिले, ‘CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आशेने आज रात्री सहावी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. मला ही महान स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.’
अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द
अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे.
रायुडू 2018 पासून CSK कडून खेळत आहे. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये 204 सामन्यांत 28.23 च्या सरासरीने 4348 धावा केल्या आहेत. रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. त्याच वेळी, अंबाती रायडू हा 6 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.
आयपीएल 2023 च्या फायनलचा थरार असाच होता
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने चार गडी गमावत 214 धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी या सामन्यात बी साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची सर्वोच्च खेळी खेळली.
मात्र पावसाच्या डकवर्थ लुईसच्या जोरावर चेन्नईला 15 षटकांत 172 धावांचे लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना रवींद्र जडेजाने सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.