IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, जाणून चाहत्यांना होणार आनंद, वाचा सविस्तर

IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएल 2024 ची सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक मोठी घोषणा करत चाहत्यांना गुड न्युज दिली आहे. संघाने मोठी घोषणा करत पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नरच्या जागी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले आहे.

हे जाणून घ्या कि, गेल्या 14 महिन्यांपासून ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातून तो थोडक्यात बचावला. त्यानंतर प्रदीर्घ उपचारानंतर तो पुन्हा तंदुरुस्त झाला.

अलीकडेच त्याला एनसीएकडून आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सहमालक पार्थ जिंदाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ऋषभचे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी संयम आणि निर्भयपणा दाखवला आहे. नव्या हंगामाची नव्या उमेदीने वाट पाहिली जाते. दिल्ली कॅपिटल्सला पुन्हा एकदा मैदानात घेऊन जाण्यासाठी मी थांबू शकत नाही.

सावध राहा, होत आहे UPI फसवणूक; काही मिनिटांत बँक खाते होणार रिकामे

23 मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध सामना

बोर्डाने वैद्यकीय अपडेटमध्ये म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या अपघातानंतर 14 महिन्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर ऋषभ पंतला आयपीएल 2024 साठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 23 मार्च रोजी चंदीगडमध्ये होणार आहे.

Maruti WagonR CNG मिळत आहे फक्त 1 लाख रुपयांत; जाणून घ्या ‘ही’ गोल्डन ऑफर

आयपीएल 2024 चा दिल्ली कॅपिटल्स संघ

ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, अक्षर पटेल, जेक फ्रेझर मॅकगर्क, ललित यादव, मिचेल मार्श, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, एनरिक नरखिया, मुकेश कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, झाय रिचर्डसन, खलील अहमद, प्रवीण दुबे, रसीख दार आणि विकी ओस्तवाल.

Leave a Comment