IPL 2023 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) खेळल्या जात असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कर्णधार शिखर धवनची बॅट जोरदार बोलली. धवनने (IPL 2023) क्रीजवर स्थिरावण्यास वेळ घेतला पण नंतर गब्बरने गुवाहाटीच्या मैदानावर आपला जबरदस्त फॉर्म दाखवला. शिखरने शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत राजस्थानच्या दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
धवनने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीदरम्यान जोरदार फटके मारले आणि 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गब्बरच्या बॅटचे हे अर्धशतक खूप खास आहे. या अर्धशतकासह धवनने आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा धवन (Shikhar Dhawan) हा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.
वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम
शिखर धवनच्या आधी आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर आहे. कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत 50 अर्धशतके केली आहेत, तर वॉर्नरने 60 अर्धशतके केली आहेत.
धवनने 56 चेंडूत 86 धावांची स्फोटक खेळी खेळली. या दरम्यान त्याने 153 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 9 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 गडी गमावून 197 धावा केल्या.
शिखर धवनसह डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या प्रभासिमरनने पहिल्याच चेंडूवर राजस्थानच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. प्रभासिमरनने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. पंजाबच्या सलामीवीराने 176 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 34 चेंडूत 60 धावा केल्या. या दरम्यान तरुण फलंदाजाने 7 वेळा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नेला.
पंजाब विजयी
या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. राजस्थानचा संघ वीस ओव्हर्समध्ये फक्त 192 धावा करु शकला. सामना जिंकण्यासाठी सहा धावा कमी पडल्या. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 192 धावाच करू शकला.