IPL 2023 : आयपीएलच्या आजच्या सतराव्या सामन्यात (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सशी सामना झाला. रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 31 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना CSK संघ 20 ओव्हर्समध्ये 6 गडी गमावून 172 धावाच करू शकला. संघाकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 50 धावा केल्या.
त्याचवेळी धोनीने 17 चेंडूत 32 धावा केल्यानंतर नाबाद राहिला, तर जडेजाने 15 चेंडूत 25 धावा केल्या. गोलंदाजीत चहल आणि अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावून 175 धावा केल्या. संघासाठी जोस बटलरने 36 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी देवदत्त पडिक्कलने 38 आणि शिमरॉन हेटमायरने नाबाद 30 धावा केल्या. गोलंदाजीत, जडेजाने सीएसकेसाठी अप्रतिम गोलंदाजी करत केवळ 21 धावांत दोन विकेट घेतल्या.
धोनी आणि जडेजाच्या जोडीलाही चेन्नई सुपर किंग्जला विजयी करता आले नाही. संदीप शर्माने सामन्यातील शेवटचा चेंडू अप्रतिम यॉर्कर टाकला आणि शेवटच्या चेंडूवर एकच धाव काढता आली. राजस्थानने 3 धावांनी विजय मिळवला आहे. जडेजाने वेगवान फलंदाजी करताना 19 व्या ओव्हरमध्ये 19 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मात्र विजय मिळवता आला नाही. धोनी आणि जडेजाने 18 व्या ओव्हरमध्ये 14 धावा केल्या.
दरम्यान, या विजयाने राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण, चेन्नई सारख्या दमदार संघाला हरवणे सोपे नव्हते. मात्र, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने ही कामगिरी करून दाखवली. आता संघाला अशीच विजयी लय कायम राखण्याची गरज आहे. संघाने मागील आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती.