IPL 2023 : आयपीएलच्या चालू हंगामात (IPL 2023) काल मुंबई इडियन्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. या सीझनमध्ये टीम पहिल्यांदाच फुल फॉर्ममध्ये दिसली. कॅमेरून ग्रीनने बॅटने जोरदार हल्लाबोल केला तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला चांगलेच हैराण केले.
प्रथम फलंदाजी करताना ग्रीनने खेळलेल्या 40 चेंडूत 60 धावांच्या तुफानी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावून 192 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूप खराब राहिली आणि संघाने 72 धावांपर्यंत मजल मारताना चार मोठ्या विकेट्स गमावल्या.
- Monsoon Updates: मान्सूनची होणार एंट्री? ‘या’ राज्यात 7 जूनपर्यंत मुसळधार पाऊस
- Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी उत्तम संधी, जाणुन घ्या नवीन दर
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला ठोठावला कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
- Asia Cup 2023 : ‘त्या’ प्रकरणात पाकिस्तानने दिली श्रीलंकेला धमकी, वाचा सविस्तर
- Airtel Recharge Plan: जबरदस्त! फक्त 155 रुपयांमध्ये एअरटेल देत आहे अनलिमिटेड कॉलिंगसह ‘ही’ भन्नाट सुविधा
मात्र, त्यानंतर हेनरिक क्लासेनने 16 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी करत ऑरेंज आर्मीला सामन्यात पुनरागमन करून दिले. हैदराबादच्या फलंदाजांनी शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी करत सामना अतिशय रोमांचक बनवला. मात्र, अर्जुन तेंडुलकरने आपल्या धारदार गोलंदाजीने हैदराबादच्या आशा धुळीस मिळवल्या.
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती. ओव्हमधील पहिल्या चेंडूवर अर्जुनने एकही धाव दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक रन आऊट मिळाला. दडपण असतानाही चांगली गोलंदाजी करणाऱ्या अर्जुनने ओव्हरचा तिसरा चेंडू वाईड टाकला. चौथ्या चेंडूवर अर्जुनने एकेरी धाव दिली, त्यानंतर पाचव्या चेंडूवर भुवनेश्वरला रोहितकरवी झेलबाद करून मुंबईच्या तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्जुनने शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या आणि मुंबईसाठी या सामन्यात सुपरस्टार म्हणून उदयास आला.