IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीने IPL 2023 च्या उद्घाटन सामन्यात प्रवेश करताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) नाणेफेक मिळाल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएलचा सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. IPL 2023 चा उद्घाटन सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एमएस धोनीने या काळात एक विक्रम केला. धोनीने वयाच्या 41 वर्षे 267 दिवसात संघाचे नेतृत्व केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध कर्णधार ठरला. धोनीने राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा विक्रम मोडला. माजी ऑस्ट्रेलियन लेगस्पिनरने शेवटचे 2011 मध्ये आयपीएलचे नेतृत्व केले होते. तेव्हा वॉर्न 41 वर्षे 249 दिवसांचा होता.
डेक्कन चार्जर्सचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आयपीएलच्या सर्वात जुन्या कर्णधारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने 2013 मध्ये 41 वर्षे आणि 185 दिवसांचे असताना डेक्कन चार्जर्सचे नेतृत्व केले होते. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्यांचे वय 40 वर्षे 133 दिवस होते.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध कर्णधारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर कायम आहे. 2012 मध्ये सौरव गांगुलीने 39 वर्षे आणि 316 दिवसांचा असताना सहारा पुणे वॉरियर्सचे नेतृत्व केले.
आयपीएलमधील एमएस धोनीच्या कर्णधारपदाबद्दल सांगायचे तर, त्याने 123 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाला 86 पराभव पत्करावे लागले तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याची विजयाची टक्केवारी 59 आहे.
चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडने शानदार खेळी करून प्रभावित केले. या युवा फलंदाजाने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची चांलचीच धुलाई करत अवघ्या 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक केले. पहिल्या सामन्यात त्याचे शतक केवळ 8 धावांनी हुकले.