IPL 2023, RCB vs KKR Highlights : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (RCB vs KKR) झाला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ आठ गडी गमावून 179 धावाच करू शकला.
कोलकाताने बेंगळुरूचा 21 धावांनी पराभव केला. IPL 2023 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 21 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 200 धावा केल्या. जेसन रॉयने 29 चेंडूंत 56 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूंत 48 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 179 धावाच करू शकला.
कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. त्याच वेळी बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला.
केकेआरचे आठ सामन्यांत तीन विजय आणि पाच पराभव आहेत. सहा गुणांसह संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बंगळुरूचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूला 18 व्या ओव्हरमध्ये 154 धावांवर आठवा धक्का बसला. 18 चेंडूत 22 धावा करून दिनेश कार्तिक बाद झाला.